जाहिरात

Gujarat News: जोडप्याचा गरब्यातील Kissing VIDEO व्हायरल, नागरिकांच्या संतापानंतर तातडीने देश सोडला

26 सप्टेंबर रोजी वडोदरा येथील कलाली ग्राऊंडवर ही घटना घडली. नवरात्री उत्सवासाठी जगभरातून एनआरआय (NRI) या कार्यक्रमात सहभागी होतात.

Gujarat News: जोडप्याचा गरब्यातील Kissing VIDEO व्हायरल, नागरिकांच्या संतापानंतर तातडीने देश सोडला
Gujarat Couple Viral Video during Garba
  • Indian-origin couple apologised after video of them kissing at Vadodara garba went viral
  • The couple attended United Way Garba, one of the world's largest Navratri events in Gujarat
  • Social media criticised the public display of affection during the religious festival
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Couple kissing Video: गुजरातच्या वडोदरा शहरात नवरात्रीदरम्यान 'युनायटेड वे गरबा' मध्ये एक वादग्रस्त घटना घडली आहे. येथील कार्यक्रमादरम्यान एका भारतीय वंशाच्या दाम्पत्याने सार्वजनिक ठिकाणी किस घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या कृतीला अनेकांनी अयोग्य ठरवल्याने मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर दाम्पत्याला अखेर पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर करून देशातून तातडीने ऑस्ट्रेलियाला परतावे लागले.

26 सप्टेंबर रोजी वडोदरा येथील कलाली ग्राऊंडवर ही घटना घडली. नवरात्री उत्सवासाठी जगभरातून एनआरआय (NRI) या कार्यक्रमात सहभागी होतात. या कार्यक्रमात, सुमारे 16 वर्षांपासून विवाहित असलेले आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झालेले हे दाम्पत्य आपल्या पालकांना भेटण्यासाठी व गरबा खेळण्यासाठी आले होते.

(नक्की वाचा-  Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये हे दाम्पत्य उत्साहाने गरबा खेळताना दिसत होते. डान्स करत असताना पतीने आपल्या पत्नीला उचलले आणि तिला किस केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला. व्हिडिओ व्हायरल होताच, स्थानिक नागरिकांनी आणि नेटिझन्सनी याचा तीव्र निषेध केला. "हे धार्मिक स्थळ आहे, नाईट क्लब नाही!" अशा संतप्त प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या. काही लोकांनी या दाम्पत्याचे समर्थनही केले.

(नक्की वाचा-  Viral Video: 'लाज वाटत नाही का..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा)

पोलिसांत तक्रारी दाखल आणि लेखी माफीनामा

सोशल मीडियावर हा वाद वाढत असतानाच, या घटनेबद्दल अटलादरा पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी तातडीने दखल घेत या दाम्पत्याचा शोध घेतला आणि त्यांना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने आपल्या कृत्याची कबुली दिली आणि झालेल्या वादाबद्दल दिलगिरी व्यक्त करत लेखी माफीनामा सादर केला. त्यांनी आपल्या कृतीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल क्षमा मागितली. माफी मिळाल्यानंतर दाम्पत्याला पुढील कायदेशीर कारवाई न करता सोडण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा संपूर्ण वाद शांत झाल्यानंतर हे दाम्पत्य तातडीने ऑस्ट्रेलियाला परतले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com