जाहिरात

Viral Video: 'लाज वाटत नाही का..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा

Airport Woman Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात.काही लोकांना प्रवासादरम्यान विचित्र घटनांना सामोरं जावं लागतं.

Viral Video: 'लाज वाटत नाही का..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा
CRPF Office vs Woman Viral Video
मुंबई:

Airport Woman Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात.काही लोकांना प्रवासादरम्यान विचित्र घटनांना सामोरं जावं लागतं, तर काही तरुण भर रस्त्यातच स्टंटबाजी करून आपला जीव धोक्यात टाकत असतात, असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याचं समोर आलंय.दिल्ली विमानतळावरही एक धक्कादायक घटना घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका महिलेनं CRPF अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोनवर बोलण्याच्या बहाण्याने चोरून फोटो काढल्याचा आरोप या महिलेनं अधिकाऱ्यावर लावला आहे. महिलेनं अधिकाऱ्याला धारेवर धरलं आणि त्याचा व्हिडीओ बनवला. सीआरपीएफ अधिकाऱ्याने महिलेचे मोबाईलमधील फोटो डिलीट केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 

नेमकं घडलं तरी काय?

एका महिलेनं आरोप केला आहे की, CRPF अधिकाऱ्याने फोनवर बोलण्याच्या बहाण्याने विमानतळावर तिचे चोरून फोटो काढले. त्यानंतर महिलेनं तातडीनं त्या अधिकाऱ्याला समोरासमोर बोलावलं आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. महिलेनं म्हटलंय की, ही घटना दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली.

जिथे  एका व्यक्तीने CRPF अधिकाऱ्याचा आयडीकार्ड घातला होता. तो व्यक्ती फोनवर बोलण्याच्या बहाण्याने त्या महिलेचे चोरून फोटो काढत होता. त्यानंतर मी त्या व्यक्तीला समोरासमोर बोलवलं आणि संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. @justbeingaayesha नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DPBi3fmgY9U/?utm_source=ig_embed&ig_rid=d6d1768b-d0e2-4a62-bb65-3a952cd0052c

आयशाने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय, 16 सप्टेंबरच्या सकाळी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर माझ्यासोबत विचित्र घटना घडली. एक व्यक्ती जो फोनवर बोलण्याचा बहाणा करत होता, तो माझे फोटो काढत होता. जेव्हा मी त्याला याबाबत विचारलं, तेव्हा त्याने फोटो काढले नसल्याचं खोटं उत्तर दिलं. पण मी त्याचा फोन चेक केला, तेव्हा मोबाईलमध्ये माझे फोटो असल्याचं मला कळलं.

त्याने माझ्या पायांचेही फोटो काढले होते. मला मोठा धक्का बसला, कारण त्या व्यक्तीने सीआरपीएफ अधिकारी असल्याचा आयडी घातला होता.महिलांची सुरक्षा करणं हे या अधिकाऱ्यांचं काम असतं, जर तेच अशाप्रकराचं कृत्य करत असतील, तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येईल. जर विमानतळावरही महिला सुरक्षित नसतील, तर मग महिला सुरक्षित कुठे असतील? असा सवालही या महिलेनं उपस्थित केला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com