
गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या गंभीर घटना घडत आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरण असो किंवा मुंबईतील बदलापूरची घटना असो... मुली, महिला कुठेच सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक संतापजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका वयोवृद्धाने केलेला प्रकार पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा प्रकार? जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये थरकाप उडवणारे अपघाताचे, तुफान हाणामारीचे तर कधी भन्नाट डान्सचे व्हिडिओ लक्ष वेधत असतात. अशातच आता एका वयोवृद्ध व्यक्तीने देवाच्या दारात केलेल्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ एका मंदिर परिसरातील आहे, तिथे आलेल्या मुलीसोबत एक भयंकर प्रकार घडला.दर्शनासाठी आलेल्या या मुलीच्या पायाचे फोटो कट्ट्यावर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने काढले. ज्यावेळी या मुलीने त्यांचा मोबाईल तपासला तेव्हा त्या फोनमध्ये तिचे खरोखर पायाचे फोटो असल्याचे दिसले, ज्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला मुलीने जाब विचारला. मुलीचा पारा चढलेला पाहताच त्या व्यक्तीने ते फोटो तात्काळ डिलीट केले.
नक्की वाचा - अल्पवयीन मुलगी गर्भवती, नांदेडमध्ये प्रसुती, नवजात अर्भकालाही...; 55 वर्षीय उपसरपंचाच्या गुन्ह्यांची परिसीमा
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कठड्यावर बसून समोर बसलेल्या मुलीकडे पाहत आहेत. तिच्या कपड्यांवरुन तर कधी तिच्या पायांवरुन नजरा फिरवत आहेत. हा प्रकार पाहून मुलीला त्यांचा संशय आला. त्यानंतर तिने त्यांच्याकडे मोबाईलची मागणी केली. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये तरुणीच्या पायांचे, छोट्या कपड्यांचे फोटो होते, ज्यावरुन मुलीने त्यांची चांगलीच खरडपट्टी केली.तसेच एक कानाखाली देऊ का? असे म्हणत तिने त्यांना जाबही विचारला.
This Uncle was clicking picture of a girl legs while sitting in the temple. She caught him red handed but he's still denying any wrongdoing, Such a Perv 😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 15, 2025
pic.twitter.com/eOo1H1LUmH
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. तसेच अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणीही केली आहे.
(नक्की वाचा- Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world