- सुरतच्या रांदेर येथील टाइम गॅलेक्सी इमारतीत १०व्या मजल्यावरून नितीनभाई अडिया खाली पडले
- नितीनभाईंचा एक पाय ग्रिलमध्ये अडकल्यामुळे ते सुमारे एक तास हवेत लटकत मृत्यूशी झुंज देत होते
- परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत सुरू केली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना वाचवले
Surat High-Rise Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच एक घटना समोर आली आहे. सुरतच्या रांदेर भागातून एक हृदयद्रावक पण तितकीच चमत्कारिक घटना समोर आली आहे. जहांगीराबाद येथील 'टाइम गॅलेक्सी' इमारतीत राहणारे नितीनभाई अडिया हे राहतात. त्यांचे वय 57 वर्ष आहे. ते या इमारतीच्या 10 मजल्यावर राहातात. ते आपल्या घराच्या खिडकी जवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास झोपले होते. त्याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट खिडकीतून खाली पडले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. पण त्यानंतर पुढे तिथल्या रहिवाशांनी अनुभवला तो एक तासाचा जीव वाचवण्याचा थरार.
नितीनभाई 10 व्या मजल्यावरून खाली कोसळले खरे, पण ते जमिनीवर न पडले नाहीत. त्याचं नशिब चांगलं होतं. म्हणून की काय ते 8 व्या मजल्यावरील खिडकीच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकले. त्यांचा एक पाय ग्रिलमध्ये अडकल्याने ते हवेत लटकत राहिले. सुमारे एक तास ते मृत्यूशी झुंज देत होते. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. एकच धावपळ तिथे असणाऱ्या नागरिकांची उडाली. त्यांनी तातडीने त्यांना वाटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तोपर्यंत नितीनभाई ग्रिलला अलटकूनच होते.
घटनेची माहिती मिळताच जहांगीरपुरा, पालनपुर आणि अडाजन या तीन केंद्रांतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी 10 व्या मजल्यावरून दोरी आणि सेफ्टी बेल्टच्या मदतीने नितीनभाईंना सुरक्षित पकडले. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने त्यांना ग्रिलमधून बाहेर काढून जीवदान दिले. त्यांना वाचवण्यासाठी जवळपास एक तास मेहनत घेतली जात होती. अनेक जण त्यावेळी चिंतेत पडले होते. नितीनभाईंचे कुटुंबीय ही चिंतेत होते. शेवटी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती
नितीनभाई यांच्या घराच्या खिडकीला ग्रिल नव्हती. त्यामुळे त्यांचा तोल गेल्यानंतर ते थेट खाली कोसळले. शक्यतो मोठ मोठ्या इमारतींच्या खिडक्यांना ग्रिल लावणे गरजेचे असते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात टाळता येवू शकतात. त्यामुळे अशा शक्यतो ज्यांनी ग्रिल लावले नसतील त्यांनी ते लावावेत असं आवाहन करण्यात आले. हा अपघात टाळता आला असता. जर त्यांच्या घराला ग्रिल असते तर. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असचं काही तरी घडलं. नाही तर मोठा अनर्थ झाला असता.
जाको राखे साइयां मार सके ना कोई! सूरत के जहांगीराबाद डी मार्ट के पास टाइम गैलेक्सी ए बिल्डिंग में बड़ा हादसा टल गया. 10वीं मंजिल से गिरा 57 वर्षीय बुजुर्ग 8वीं मंजिल की जाली में फंस गया. फायर डिपार्टमेंट ने तुरंत रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया और एक घंटे की मशक्कत के बाद बुजुर्ग को… pic.twitter.com/fyjtt2wx5I
— NDTV India (@ndtvindia) December 25, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world