जाहिरात

India Vs Pakistan: पाकिस्तानमध्ये 3 शक्तीशाली स्फोट, देशभरातील हवाई वाहतूक बंद

Operation Sindoor: भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत नूर खान, शोरकोट आणि मुरीद हवाई तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. 

India Vs Pakistan: पाकिस्तानमध्ये 3 शक्तीशाली स्फोट, देशभरातील हवाई वाहतूक बंद

India Vs Pakistan:  पहलगाम हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत. अशातच पाकिस्तानमध्ये नूर खान, शोरकोट आणि मुरीद हवाई तळांवर हल्ले झाल्याचे सांगण्यात येत असून हे हवाई अड्डे बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील नूर खान शोरकोट आणि मुरीद हवाई तळांवर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने संपूर्ण हवाई क्षेत्र रिकामे केले असून नूर खान एअरबेसवरील हल्ल्यात सी- 130 चे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने भारतात अनेक हवाई हल्ले केले, जे हवेतच नष्ट करण्यात आले. त्यानंतर नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानकडून खूप गोळीबार होत आहे.

 त्याआधी श्रीनगरमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. असे सांगितले जात आहे की पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, जी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत नूर खान, शोरकोट आणि मुरीद हवाई तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना

नूर खान हवाईतळ: रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर मोठा स्फोट ऐकू आला. नूर खान एअरबेस हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्थित एक लष्करी एअरबेस आहे. हे एअरबेस पाकिस्तान हवाई दलाद्वारे चालवले जाते आणि लष्करी आणि नागरी कारणांसाठी वापरले जाते.

मुरीद एअरबेस: पाकिस्तानचा मुरीद एअरबेस पंजाब प्रांतातील चकवाल येथे आहे. 1971 च्या युद्धात भारताने येथे हवाई हल्ला केला होता आणि त्यात बरेच नुकसान झाले होते. या एअरबेसचा वापर ड्रोन चालवण्यासाठी आणि देखरेखीसाठी केला जातो.

शोरकोट एअरबेस: शोरकोट एअरबेस हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्यात स्थित एक अतिशय महत्त्वाचे लष्करी विमानतळ आहे. हे हवाई तळ इस्लामाबादपासून सुमारे 337 किलोमीटर दक्षिणेस आहे आणि स्क्वॉड्रन लीडर सरफराज अहमद रफीकी यांच्या सन्मानार्थ त्याचे नाव देण्यात आले आहे. त्याला रफिकी एअरबेस असेही म्हणतात.

नक्की वाचा - India Pakistan News : पाकिस्तानला मिळालं IMF कडून कर्ज? तब्बल 1 अब्ज डॉलर मिळाल्याचा पाकिस्तानच्या पीएमचा दावा  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com