India-Pakistan Tension Live Update : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने पुकारलेलं ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू आहे. पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. 8 मेच्या रात्री पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानच्या सीमावर्ती भागातही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानं पाडली आहे.
पंतप्रधान मोदींची विदेश मंत्री एस.जयशंकर यांच्या बरोबरची बैठक संपली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेश मंत्री एस जयशंकर आणि अजित डोभाळ यांची महत्वाची बैठक संपली आहे. सध्याच्या स्थितीबाबत त्यांनी याबैठकीत चर्चा केल्याचे समजत आहे.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला आहे. हा हल्ला नागरि वस्तीवर करण्यात आला आहे. त्यात एका घराचे नुकसान झाले आहे. शिवाय घरातील व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
श्रीनगरमध्ये संपूर्ण ब्लॅक आऊट
श्रीनगरमध्ये संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. शिवाय सायरन वाजवण्याचे आवाज ही येत आहेत.
जम्मू,सांबा,पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले
जम्मू,सांबा,पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. अशी माहिती संरक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्याबाबतचे ट्वीट एएनआय या वृत्त संस्थेने केले आहे.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान कडून पुन्हा गोळीबार
काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू केला आहे. शिवाय तोफगोळ्यांचा ही वापर केला आहे. त्यामुळे या भागात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली माजी सैनिकांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशस्त्र दलाच्या माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थितीतील विविध मुद्द्यांवर माजी सैनिकांशी सविस्तर संवाद साधला. यामध्ये माजी हवाई दल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि देशाची सेवा केलेले इतर माजी सैनिक यांचा समावेश होता.
आरोग्य खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द
आरोग्य खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या स्टेशन रजाही रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. रजेवरच्या अधिकाऱ्यांना तातडीनं ज्वाईनिंगचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानचा 36 ठिकाणी 400 वेळा ड्रोनने घुसण्याचा केला प्रयत्न
पाकिस्तानने भारतात 36 ठिकाणी 400 वेळा ड्रोनने घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाकिस्ताननं एलओसीचं अनेकवेळा उल्लंघन केलं. भारताच्या हद्दीतील माहिती मिळवण्यासाठी ड्रोन पाठवले होते. तुर्कीतले असेसगार्ड ड्रोन असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशी माहिती ही देण्यात आली. उरी, पूंछ, मेंढक अखनूर या भागात पाकिस्तानने घुसखोरी केली. पाकिस्तान आपल्या नागरी एअरलाईन्सचा उपयोग ढाल म्हणून उपयोग करत आहे. असं ही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
चंदीगडमध्ये 7 च्या आत दुकानं बंद करण्याचे आदेश
चंदीगडमध्ये 7 च्या आत दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दुकाने, रेस्टॉरंटस् सातच्या आत बंद होतील. फक्त मेडिकलची दुकानं सुरु ठेवली जाणार आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मसूरीमध्ये कार दरीत कोसळली, महाराष्ट्रातले 3 पर्यटक जखमी
मसूरी धनोल्टी मार्गावर लक्ष्मणपुरी जवळ हा अपघात झाला. रस्त्यात एक प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात गाडी दरीत कोसळली. या अपघातात चालक प्रशांत सकलानीसह महाराष्ट्रतून आलेले जय देसाई , झरना देसाई आणि तृषा देसाई हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मच्छीमारांना सतर्क राहाण्याचा इशारा
आम्ही नौदल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीत सहभागी झालो होतो. आम्हाला सूचना देण्यात आली आहे की जेव्हा आम्हाला दुसऱ्या राज्यातील कोणतीही बोट दिसेल तेव्हा अधिकाऱ्यांना सतर्क करावे. कोणत्याही व्यापारी जहाजाबद्दलही माहिती द्यावी, असं सांगण्यात आलं. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी या बैठकीची माहिती दिली.
गुजरातमध्ये फटाके, ड्रोन उडवण्यावर बंदी
गुजरातमध्ये फटाके, ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 मेपर्यंत फटाके, ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी
पुणे शहरात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे . शहरातील अनेक भागात दुपारी मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून सुटका मिळालीय. आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
LOC वर पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती
LOC वर पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती. अनेक घरांचंही नुकसान झाल्याची माहिती.जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांनी उरीमध्ये जाऊन घेतली परिस्थितीचा आढावा.
दिल्लीत हालचालींना वेग, NSA अजित डोभाल गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान दिल्लीत बेठकांचा सिलसिला. NSA अजित डोभाल गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला पोहोचले. बैठकीला IB चीफ देखील उपस्थित.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक बॉम्बसदृश वस्तू आढळली, सुरक्षा दल आणि पोलिस घटनास्थळी दाखला
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक बॉम्बसदृश वस्तू आढळली, सुरक्षा दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातला कार्यक्रम केला रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातला कार्यक्रम केला रद्द
राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीसाठी 10 मे म्हणजे शनिवारी पुण्यात येणार होते
देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज ठाकरे यांनी मुलाखत रद्द केली
IPL 2025 : पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना ट्रेनऐवजी रस्तेमार्गाने दिल्लीला आणले जाणार
पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना ट्रेनऐवजी रस्तेमार्गाने दिल्लीला आणले जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने दिल्लीला आणण्याची परवानगी देण्यात आली नाही.
"सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत...", भारत-पाकिस्तान तणावावर चीनची प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तान तणावावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, "आम्ही काल भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चीनची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या घडामोडींबद्दल चीन चिंतेत आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते दोघेही चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाता विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची न करण्याचे आवाहन करतो."
जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय हद्दीत घुसखोरी करताना BSF ची कारवाई
BSF ने गोळीबार करत घुसखोरीचा डाव हाणून पाडला
दिल्लीतील डॉक्टरांच्या सुट्ट्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द
दिल्लीतील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द
पुढील आदेश येईपर्यंत डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द
उत्तराखंड, हिमाचल प्रदेशनंतर दिल्ली सरकारचा निर्णय
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत भाविकांची गर्दी असणारे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने 50 ड्रोन केले केले नष्ट, सूत्रांची माहिती
भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने 50 ड्रोन केले केले नष्ट, सूत्रांची माहिती
LOC वर भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त
LOC वर भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त
भारतीय लष्कराच्या जोरदार प्रत्युत्तरात नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांनंतर ही कारवाई करण्यात आली.
भारतीय लष्कराने सांगितले की, कोणत्याही आक्रमक हालचालींना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
मुंबईत नौसेनेची मच्छिमारांसोबत बैठक
मुंबईत नौसेनेची मच्छिमारांसोबत बैठक
मच्छिमारांना संवेदनशील भागात न जाण्याचे निर्देश
मच्छिमारांच्या बोटींचा सर्वे केला जाणार
जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये पाकड्यांचा घुसखोरीचा डाव उधळला
जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये पाकड्यांचा घुसखोरीचा डाव उधळला
पाकड्यांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न
BSF ने घुसखोरांचा खात्मा केला
10-12 जणांचा ग्रुप भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता
भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारतीय लष्कराने कारवाई व्हिडीओ केला जारी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी चर्चा करणार
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भाषेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय सैन्याच्या या कारवाई आणि सध्याच्या परिस्थितीबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही सैन्य प्रमुखांशी चर्चा करणार आहे.
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरु
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरु
कुपवाडा, बारामुल्ला सीमावर्ती भागातही पाकिस्तानकडून गोळीबार
अमृतसरच्या अटारीजवळ पाकिस्तानी ड्रोन पडला
अमृतसरच्या अटारीजवळ पाकिस्तानी ड्रोन पडला
पंजाब पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
सीमेवर तणाव वाढल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये रेड अलर्ड जारी
अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचा नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न
पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) येथे विविध ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न
उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सने मोठ्या प्रमाणात काउंटर-ड्रोन ऑपरेशन
या कारवाईत L-70 तोफा, Zu-23mm, शिल्का सिस्टीम आणि इतर अॅडव्हान्स काउंटर-UAS उपकरणांचा वापर करण्यात आला
पाकिस्तानचा नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न
पाकिस्तानचा नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न
उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सने मोठ्या प्रमाणात काउंटर-ड्रोन ऑपरेशन
या कारवाईत L-70 तोफा, Zu-23mm, शिल्का सिस्टीम आणि इतर अॅडव्हान्स काउंटर-UAS उपकरणांचा वापर करण्यात आला
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग सुरुच
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग सुरुच
भारताकडून चोख प्रत्युत्तर
दिल्ली सरकारकडून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
दिल्ली सरकारकडून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
पुढील आदेश येईपर्यंत सुट्ट्या रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक
देशातील सद्यस्थिती पाहता राज्यातील परिस्थिती आढावा घेणार
मुंबईत अनेक ठिकाणी चेकपोस्ट, वाहनांची तपासणी केली जात आहे
India Vs Pakistan : जम्मू-काश्मीर सीेमेवर नागरिकांनी रात्रभर काय अनुभवलं?
जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी रात्रभर काय अनुभवलं?
पाकिस्तान रात्रभर काय कुरघोड्या केल्या?
पाकिस्तानातील अनेक शहरांवर भारताचे हल्ले
पाकिस्तानातील अनेक शहरांवर भारताचे हल्ले
पाकिस्तानची अनेक सैन्य स्थळांवर हल्ले
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जम्मूमध्ये जाणार
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जम्मूमध्ये जाणार
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेणार
जम्मू-काश्मीरमध्ये १० मे पर्यंत शाळा-कॉलेज बंद
जम्मू-काश्मीरमध्ये १० मे पर्यंत शाळा-कॉलेज बंद
देशातील २७ विमानतळे १० मे पर्यंत बंद राहणार
LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थिती तणावपूर्ण
LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थिती तणावपूर्ण
पुंछ, कुपवाडा, अखनूर, उरीमध्ये गोळीबार
भारतीय सेन्याचा पाकड्यांचा चोख प्रत्युत्तर
LOC,आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्रभरा ब्लॅकआऊट
पाकिस्तानने भारतावर कुठे-कुठे हल्ला करण्याचा प्रयत्न केला?
पाकिस्तानने भारतावर कुठे-कुठे हल्ला करण्याचा प्रयत्न केला?
Live Update : LOC वर गोळीबार सुरूच
Live Update : कुपवाडामध्ये रात्री गोळीबार थांबला होता, पण पहाटे पुन्हा गोळीबार सुरू
कुपवाडामध्ये रात्री गोळीबार थांबला होता, पण पहाटे पुन्हा गोळीबार सुरू
नियंत्रण रेषेवरील जवळजवळ सर्व ठिकाणी गोळीबार होत आहे.
भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे.
श्रीनगरमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित आहे. इतर शहरांमध्येही वीजपुरवठा खंडित आहे.
Live Update : रात्रीतून भारत-पाकिस्तानदरम्यान काय काय घडलं?
Live Update : पंजाबमध्ये ब्लॅकआऊटचे आदेश, पोलिसांकडून नागरिकांना सूचना
पंजाबमध्ये ब्लॅकआऊटचे आदेश, पोलिसांकडून नागरिकांना सूचना
सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घरातच राहावे आणि खिडक्यांपासून दूर राहावे आणि लाईट बंद ठेवावे आणि खिडक्यांचे पडदे लावावेत. घाबरून जाण्याची गरज नाही, आता सायरन वाजेल आणि स्पष्ट होताच आम्ही पुन्हा संदेश देऊ. आमचे सशस्त्र दल कामावर आहेत आणि आपल्याला घरात राहून त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती अमृतसर डीपीआरओकडून देण्यात आली आहे.