
Operation Sindoor Live Updates: भारतीय लष्कराकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना चांगलाच दणका दिला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्यामध्ये शेकडो दहशवतादी मारले गेले. यामध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रौफ अझहरचाही खात्मा झाला. या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकचे लष्करातील अधिकारी उपस्थित राहिल्याने जगभरातून टीकेची झोड उठली आहे. यावरुनच वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचे वडील ज्युडिया पर्ल पाकला खडेबोल सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
7 मे रोजी भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानी अतिरेकी आणि जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा नेता अब्दुल रौफ अझहरचा खात्मा झाला. त्याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी लष्करी अधिकारी अंत्यसंस्काराला उपस्थित होते. यावरुनच 2022 मध्ये दहशतवाद्यांद्वारे अपहरण करुन हत्या झालेले वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचे वडील ज्युडिया पर्ल यांनी संताप व्यक्त केला आहे.
I wish these dignitaries could tell us: "What exactly are you mourning? What role models you wish your children to revere? What have you learned from this man? https://t.co/Z6DRQFJvkR
— Judea Pearl (@yudapearl) May 9, 2025
ज्युडिया पर्ल यांनी एक्स माध्यमावर पोस्ट शेअर करत पाकिस्तानला सवाल विचारले आहेत. तुम्ही खरोखर कशासाठी शोक करत आहात? तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या आदर्शांचा आदर करायला शिकवत आहात? या माणसाकडून तुम्ही काय शिकलात? हे या मान्यवरांनी आम्हाला सांगावे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानी नागरिकांनं काढले स्वत:च्याच देशाचे वाभाडे, Video पाहून प्रत्येक भारतीय होईल खुश )
तसेच "पाकिस्तानी अतिरेकी आणि जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा नेता" होता. "त्याचा गट डॅनियलच्या अपहरणात थेट सहभागी नव्हता पण अप्रत्यक्षपणे जबाबदार होता, कारण त्याच्या (रौफच्या) कृतींमुळे कंधार अपहरणादरम्यान ओमर शेखची तुरुंगातून सुटका झाली. नंतर मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या शेखने डॅनियलला कैदेत आणले," असे जुडिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, 2022 मध्ये ओमर शेखने वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या अमेरिकन ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करून त्याचा शिरच्छेद केला. या संपूर्ण घटनेत रौफचाही सहभाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रौफ हा मसूद अझहरच्या त्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांपैकी एक होता जे या कारवाईत मारले गेले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमधून पाकिस्तानी दहशतवादी गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संबंध उघडकीस आले आहेत.
( नक्की वाचा : पाकिस्तानी नागरिकांनं काढले स्वत:च्याच देशाचे वाभाडे, Video पाहून प्रत्येक भारतीय होईल खुश )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world