काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 26 भारतीयांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी पुरुषांना टार्गेट करण्यात आल्याचं दिसतं. 'मोदींना जाऊन सांगा' असं एका दहशतवाद्याने येथील भारतीय महिला पर्यटकाला सांगितलं होतं. अखेर भारतीय सैन्यायने याचं थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर अवघ्या 15 दिवसात भारतीय सैन्याने याचा बदला घेतला आणि पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, 62 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे.
नक्की वाचा - India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video
संरक्षण मंत्रालय काय म्हणालं?
काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे. या ठिकाणांवर भारतावर हल्ल्यांची तयारी केली जात होती. एकूण नऊ (9) ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला आहे. ही पावले पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते.