जाहिरात

India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे.

India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा निष्पाप बळी गेला. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली. आज पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली. यामध्ये 33 दहशतवारी मारले गेल्याची माहिती आहे.

केंद्र सरकारकडून 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिक घेणार असल्याचं सांगितलं जात असताना भारताने थेट पाकिस्तानातील दहशतवादांची तळं उद्ध्वस्त केली. रात्री पाकिस्तानी दहशतवादी झोपेत असताना भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करीत त्यांची तळं जमिनदोस्त केली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बॉम्ब पडल्यानंतर स्फोट झाल्याचं दिसून येत आहे. यावेळी जवळ काही नागरिक उभे असल्याचं दिसत आहे. यातील काहीजण दुचाकीवर आहेत. 

भारतीय सैन्याकडून महत्त्वाची अपडेट

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे. ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती.  आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण नऊ (9) ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही.

Operation Sindoor : भारताने हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली, सविस्तर समजून घ्या

नक्की वाचा - Operation Sindoor : भारताने हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली, सविस्तर समजून घ्या

भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला आहे. ही पावले पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. आपण या घटनेमागे जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याच्या आपल्या वचनाशी प्रामाणिक राहतो, असं भारतीय सैन्यांकडून सांगितलं जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com