रुपेश सामंत, पणजी
विरोधी पक्षांच्या विरोधानंतर दोन औद्योगिक दिग्गजांनी राज्याबाहेर नियोजित केलेली भरती मागे घेतली आहे. कंपन्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात त्यांची भरती मोहीम मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला. सरदेसाई यांनी INDOCO REMEDIES फार्मा कंपनीच्या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेतला. कंपनीने महाराष्ट्रातील बोईसर येथे वॉक-इन मुलाखतीसाठी जाहिरात दिली होती. गोव्यात काँग्रेस पक्षानेही या मुद्द्याचा पाठपुरावा केला होता. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनीही या भरतीवर आक्षेप घेतला होता.
(नक्की वाचा- हेलिकॉप्टर हवेत गर गर फिरलं अन् जमिनीवर आदळलं, केदारनाथमधील दुर्घटनेचा थरारक VIDEO)
याविषयी विरोधकांनी प्रसारमाध्यमांद्वारे बोलल्याने कंपनीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून भरती मागे घेत असल्याची माहिती दिली. हा मुद्दा निकाली निघण्यापूर्वीच, आणखी एक फार्मा कंपनी ENCORE इथिकल्स प्रायव्हेट लिमिटेडने गुरुवारी पुण्यात वॉक-इन मुलाखतीची घोषणा करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. ही बाब समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी आपला आक्षेप सुरूच ठेवला. गुरुवारी संध्याकाळी, कंपनीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून घोषणा केली की ते भरती मागे घेत आहेत.
नक्की वाचा - सोनं, तरुणी आणि फ्लॅट... बांगलादेशी खासदाराच्या मर्डर मिस्ट्रीची पूर्ण 'कहानी'
मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी गोव्यातील रोजगाराच्या संधी रोखण्यात राज्य सरकार कंपन्यांसह सहभागी असल्याचा आरोप केला. सरदेसाई म्हणाले की, गोवावासीयांसाठी नोकरीच्या संधींचे संरक्षण करण्याचे धोरण असावे. ते म्हणाले की, त्यांच्या पक्षाने राज्य विधानसभेत खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती.