जाहिरात

Job Alert: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीसाठी तयारी करताय? प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा!

PCMC Recruitment Scam Alert: पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसून, बनावट नियुक्तीपत्रांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Job Alert: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीसाठी तयारी करताय? प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर पालिकेच्या नावाने विविध पदांसाठी भरती सुरू असल्याची दिशाभूल करणारी माहिती आणि बनावट नियुक्तीपत्रे (Appointment Letters) फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

बनावट याद्या आणि खोट्या जाहिराती

प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार, काही ठिकाणी उमेदवारांच्या बनावट निवडीच्या याद्या तयार करून त्यांना नियुक्तीपत्रेही दिली जात आहेत. खासगी मेसेजिंग ॲप्स आणि अनधिकृत वेबसाइट्सच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचेही संशय व्यक्त केला जात आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणतीही नवीन भरती प्रक्रिया सुरू नाही आणि भरतीबाबत कोणताही अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

फसवणूक कशी टाळाल?

प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही खासगी संदेशांवर किंवा मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये. फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे. भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती केवळ महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. कोणताही मेसेज आल्यास अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा-  Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)

कायदेशीर कारवाईचा इशारा

अशा प्रकारे महापालिकेची बदनामी करणाऱ्या आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी किंवा महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com