दिल्लीतील जवळपास 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ

Schools Get Bomb Threat : धमकीची माहिती मिळताच श्वान पथक, बॉम्ब शोधक पथके आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये पोहोचले. शोध मोहीम सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्लीतील जवळपास 40 खासगी शाळांना ई मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. 8 डिसेंबर रोजी रात्री 11.38 च्या सुमारास धमकीचा मेल आला आहे. शाळेच्या आवारात बॉम्ब पेरण्यात आल्याचे ईमेलमध्ये सांगण्यात आले. या बॉम्बचा स्फोट झाला तर मोठे नुकसान होईल. मेल पाठवणाऱ्याने बॉम्बस्फोट न करण्याच्या बदल्यात 30 हजार डॉलर्सची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी आयपी ॲड्रेस आणि मेल पाठवणाऱ्याचा तपास सुरू केला आहे.

दिल्लीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.06 मिनिटांनी दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस), आरके पुरम आणि सकाळी 6.15 मिनिटांनी जीडी गोयनका या शाळांना धमकी मिळाल्याची माहिती मिळाली. धमकीनंतर विद्यार्थ्यांना घरी परत पाठवण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धमकीची माहिती मिळताच श्वान पथक, बॉम्ब शोधक पथके आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये पोहोचले. शोध मोहीम सुरु आहे. मात्र आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

(नक्की वाचा: 'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल)

सकाळची वेळ शाळांमध्ये वर्दळीची असते. शाळेच्या बसेस येतात, पालक आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी येतात. कर्मचाऱ्यांची एकीकडे तयारी सुरु असते. अशा वेळी धमकी मिळालेल्या सर्वांचीच धावपळ झालेली पाहायला मिळाली.

Advertisement

इतर VIDEO

Topics mentioned in this article