पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरूवात केली. सिंधु नदी पाणी करार स्थगित करत पहिला दणका दिला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. त्यांना भारत सोडण्यास सांगण्यात आलं. त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले. पाकिस्तानचे नेते त्यामुळे बिथरले आहेत. पाकचे नेते आता धमक्याची बात करू लागले आहेत. युद्धची चेतावणी देत आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रीअसलेल्या हानिफ अब्बासी यांनी आमच्याकडे असलेल्या अणुबॉम्बची तोंड तुमच्याच दिशेने आहेत अशी धमकी दिली आहे. तर बिलावल भुत्तो याने सिंधु नदीचं पाणी पाकिस्तानला मिळालं नाही, तर त्या नदीत रक्त वाहील असं वक्तव्य केलं आहे. पण बच्चा असलेल्या पाकिस्तानला अजूनही भारताच्या सैन्य शक्तीचा अंदाज आलेला नाही. या दोन्ही देशांची सैन्य शक्ती किती आहे त्यावर एक नजर टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. म्हणूनच पाकिस्तानचे हे नेते आता भारताला पोकळ धमक्या देत सुटले आहेत. बिलावल भुट्टोने सिंधू नदीत रक्ताचे पाट वाहतील असा इशारा दिला. पाकिस्तानचा रेल्वे मंत्र्याने ही गरळ ओकत अणू युद्धाची धमकी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन मोठी आणि दोन लहान युद्ध झाली. या सगळ्या युद्धकाळातही भारतानं पाकिस्तानचं पाणी कधीही थांबवलं नाही. त्यामागे मानवतावादी दृष्टीकोन होता. पण पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताच्या डोक्यावरुन पाणी गेलं आहे.भारताने सिंधू जलकरार रद्द करून पाकला पहिला दणका दिला. यानंतर पाकचे नेते युद्धाचीच भाषा करत आहेत. मात्र त्यांना भारताच्या लष्करी, सागरी आणि हवाई सामर्थ्याचा विसर पडलेला दिसतोय.
भारत विरुद्ध पाकिस्तान, कुणाची ताकद किती?
जगभरातील लष्करांच्या तुलनेत भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद आहे. तर पाकिस्तान या क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर येतो. सैनिकांची संख्या पाहता भारताकडे 14 लाख 55 हजार सक्रिय सैनिक आहेत. तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या 11 लाख 55 हजारांच्या जवळपास आहे. पाकिस्तानकडे तुलनेने केवळ 6 लाख 54 हजार सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी 5 लाख 5 हजार इतकी आहे. भारताकडे 4,201 टँक आहे. यामध्ये T-90 भिष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत. तर पाकिस्तानकडे ही संख्या 2,627 टँक इतकी आहे. यामध्ये अल-खालिद, T-80UD आणि अल-जर्रार यांचा समावेश आहे.भारताकडे एकूण 2,229 लष्करी विमानं आहेत. तर पाकिस्तानकडे ही संख्या 1 हजार 399 इतकी आहे. भारताकडे लढाई विमानांची संख्या 513 इतकी तर पाकिस्तानकडे हीच संख्या 328 इतकी आहे. भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई, राफेल, मिराज सारखे आधुनिक फाईटर जेट्स सहभाग आहे. तर पाकिस्तानकडे JF-17 थंडर, F-16 आणि मिराज यांचा समावेश आहे.
भारताचे नौदल पाकिस्तानपेक्षा खूप मोठे आणि प्रगत आहे. भारताकडे दोन विमानवाहू जहाजांसह एकूण 293 जहाजे आहेत. तर पाकिस्तानकडे 121 जहाजं असून एकही विमानवाहू जहाज नाही. भारताकडे 18 पाणबुड्या आहेत. पाकिस्तानचा विचार केला तर त्यांच्याकडे फक्त 8 पाणबुड्या आहेत. अण्वस्त्र क्षमतेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, आण्विक शस्त्र साठ्यात भारत हा सहाव्या क्रमांकाचा देश आहे. भारताकडे सध्या 172 अणुबॉम्ब आहेत. पाकिस्तान आण्विक शस्त्र साठ्यात 7 व्या क्रमांकाचा देश आहे. पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत.जर भारत पाकिस्तान युद्ध झालंच. तर पाकिस्तान अवघे सहा ते सात दिवसही भारतासमोर तग धरू शकणार नाही. हीच परिस्थिती त्यांचे नेतेही जाणून आहेत. म्हणून पाकिस्तानकडून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली जातेय. पण इथेही भारत पाकिस्तानच्या दोन पावलं पुढेच आहे. भारताकडे पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्रांची मालिका आहे. यात पृथ्वी-1- क्षेपणास्त्राची रेंज 150 किलोमीटर असून ते थलसेनेत वापरले जाते. पृथ्वी-2- क्षेपणास्त्राची रेंज 250 ते 350 किलोमीटर असून ते वायुदलाकडून वापरले जाते.
पृथ्वी-3- ची रेंज 350 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.अग्नी-1- क्षेपणास्त्र 700 किलोमीटर अंतरावर मारा करू शकते. अग्नी-3- ची रेंज 2000 किलोमीटरहून अधिक आहे. अग्नी-4- क्षेपणास्त्र 4000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते. तर अग्नी-5- ही आंतरखंडीय बैलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM)असून तिची रेंज 5000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. दरम्यान पाकिस्तानने आता अशी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत, ज्यामुळे भारतातील बहुतेक शहरांवर निशाणा साधता येऊ शकतो. पाकिस्तानकडे असलेल्या गौरी-1- क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 1100 किलोमीटर आहे. गौरी-2- क्षेपणास्त्राची रेंज 1800 ते 2000 किलोमीटर आहे. शाहीन-1 क्षेपणास्त्र 750 किलोमीटर अंतरावर मारा करू शकते. शाहीन-2 क्षेपणास्त्राची रेंज 1500 ते 2000 किलोमीटर आहे. शाहीन-3 क्षेपणास्त्राची रेंज 2750 किलोमीटर आहे. मात्र पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता अजूनही मर्यादित असल्याचं मानलं जातं.भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानी नेते भडकावू भाषण ठोकत सुटलेत. पण भारताने डायलॉगबाजीपेक्षा अॅक्शनवर जास्त भर दिलाय.