जाहिरात

Pahalgam Attack: NIA ने सूत्रे फिरवली, पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा; काय लागले हाती?

Pahalgam Terror Attack NIA: पोलिसांनी परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. तसेच, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीवरही लक्ष ठेवले जात आहे.

Pahalgam Attack: NIA ने सूत्रे फिरवली, पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा;  काय लागले हाती?

Pahalgam Terror Attack:  जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग दिला आहे. हल्लेखोरांच्या कार्यपद्धतीचा सुगावा घेण्यासाठी एनआयएचे अधिकारी घटनास्थळावरील प्रवेश आणि निर्गमन मार्गांची बारकाईने तपासणी करत आहेत.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात पाचपेक्षा जास्त दहशतवादी सहभागी होते. हल्लेखोरांनी कथितरित्या संवाद साधण्यासाठी उपग्रहीय दूरध्वनी (satellite phone) आणि चीनमध्ये तयार झालेले मोबाईल हँडसेट वापरले असण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा या संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा 

या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा (LeT) किंवा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) यांसारख्या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय आहे. एनआयए या दिशेनेही कसून तपास करत आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. तसेच, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीवरही लक्ष ठेवले जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि काही संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर एनआयएने या हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. या हल्ल्यात आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(नक्की वाचा- लग्नासाठी कुणी मुलगी देईना, सुनाही निघून गेल्या... 'या' गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव!)

दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक तालिबानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी काबूलला रवाना झाले आहे. या भेटीमध्ये प्रामुख्याने व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णांना व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी राजनैतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घडामोडी अशा वेळी होत आहेत, जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. नुकतेच आयजी आणि एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवरही हल्ले झाले होते, ज्यामध्ये सुरक्षा दलांना मोठे नुकसान झाले. एनआयए या सर्व घटनांचा सखोल तपास करत आहे.