जाहिरात

Pahalgam Terror Attack: भ्याड हल्ल्यानंतर कारवाईचा दणका! सुरक्षा दलाकडून 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

Pahalgam Terror Attack: स्थानिक दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी केलेली ही एक मोठी कारवाई आहे. गेल्या 6 दिवसांत 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

Pahalgam Terror Attack: भ्याड हल्ल्यानंतर कारवाईचा दणका! सुरक्षा दलाकडून 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

Pahalgam Terror Attack Update: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यापासून, अधिकारी दहशतवाद्यांवर मोठी मोहीम राबवत आहेत. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली असून आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी केलेली ही एक मोठी कारवाई आहे. गेल्या 6 दिवसांत 10दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे.  या दहशतवाद्यांची घरे स्फोटांद्वारे उडवली जात आहेत. यापूर्वी फक्त 6 दहशतवाद्यांची घरे उडवून देण्यात आली होती आणि त्यानंतर आता इतर 4 दहशतवाद्यांची घरेही उडवून देण्यात आली आहेत. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमदचा समावेश आहे, जो सध्या पाकिस्तानात आहे.

याशिवाय, मोहम्मद शफी दार यांचा मुलगा अदनान सफी दार यांचे आणखी एक घर पाडण्यात आले आहे. तो शोपियान जिल्ह्यातील आणखी एक सक्रिय दहशतवादी आहे, जो 2024 पासून लष्कर आणि टीआरएफसाठी संयुक्तपणे काम करत होता. बांदीपोरा येथील अब्दुल अहद शीर गोजरी यांचा मुलगा जमील अहमद शीर गोजरी यांचे घर स्फोटात उद्ध्वस्त झाले. तो 2016 पासून सक्रिय दहशतवादी आहे.

नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

त्याच वेळी खासीपोरा त्राल जिल्हा पुलवामा येथील रहिवासी नजीर अहमद वाणी यांचा मुलगा सक्रिय दहशतवादी अमीर नजीर वाणी यांचे निवासी घर देखील एका संशयास्पद स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता आणि 2024 मध्ये दहशतवादात सामील झाला.

या दहशतवाद्यांची घरं झाली उद्ध्वस्त
    • आदिल हुसेन ठोकर, अनंतनाग (लष्कर-ए-तैयबा)
    • आसिफ शेख, त्राल (लष्कर-ए-तैयबा)
    • शाहिद अहमद कुट्टे, शोपियां
    • जाकीर अहमद गनई, कुलगाम (लष्कर)
    • अहसान उल हक, पुलवामा
    • आमिर नज़ीर वानी, अवंतीपोरा (जैश-ए-मोहम्मद)
    • जमील अहमद शेर गोजरी, बांदीपोरा (२०१६ पासून सक्रिय)
    • आमिर अहमद डार, शोपियां (लष्कर-ए-तैयबा)
    • अदनान साफी डार, जैनपोरा (टीआरएफ)
    • फारूक अहमद तेडवा, कुपवाडा