जाहिरात

Ceasefire Violation : बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC वर गोळीबार, 3 नागरिकांचा मृत्यू

Three civilians were killed in Jammu and Kashmir : पाकिस्तानने सलग दोन आठवडे भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू आहे.

Ceasefire Violation : बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC वर गोळीबार, 3 नागरिकांचा मृत्यू

Pakistan Ceasefire Violation : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने LOC वर गोळीबार सुरु केला. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. ज्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले, असे लष्कराने म्हटले आहे. 

पाकिस्तानने सलग दोन आठवडे भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा चालवणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर भारताने अचूक हल्ले केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने आज सकाळी गोळीबार सुरु केला. 

(नक्की वाचा-  Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते)

1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त हल्ला केला. पहाटे 1.44 वाजता या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. याला 'ऑपरेशन सिंदूर' हे नावे देण्यात आलं आहे. 

(Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त; वाचा 10 मोठे अपडेट्स)

भारताने हल्ला केलेली दहशतवादी ठिकाणे

  • बहावलपूर- आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे.
  • मुरीदके – सीमेलगत, सांबासमोर सुमारे 30 किमीवर लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा तळ आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणहून ट्रेनिंग घेऊन आले होते.
  • गुलपूर – नियंत्रणरेषेपासून (LoC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथे आहेत.
  • सवाई LeT कॅम्प – PoJK मधील टंगधार सेक्टरमध्ये, 30 किमी आत आहे. सोनमर्गमध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्गमध्ये 24 ऑक्टोबर 2024, पहलगामध्ये  22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यांचा संबंधांमुळे इथे हल्ला करण्यात आला. 
  • बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे.
  • कोटली LeT कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 15 किमी आत, राजौरी समोर आहे. LeT चा आत्मघातकी तळ असून सुमारे 50 दहशतवाद्यांची क्षमता आहे.
  • बर्नाळा कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 10 किमी आत राजौरी समोर आहे.
  • सरजल कॅम्प – JeM चा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी आत सांबा-कठुआ समोर हा कॅम्प आहे.
  • महमूना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत, सियालकोटजवळ हे ठिकाण आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Operation Sindoor, Pak Violates Ceasefire Along LoC, Pahalgam Terror Attack, भारत पाकिस्तान
Listen to the latest songs, only on JioSaavn.com