जाहिरात

PM Kisan 20th Installment Date: 20 वा हफ्ता जमा कधी येणार? जाणून घ्या EKYC ची प्रक्रिया

PM Kisan 20th Installment Date:पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 2025) यापूर्वीचा, म्हणजेच 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.

PM Kisan 20th Installment Date: 20 वा हफ्ता जमा कधी येणार? जाणून घ्या EKYC ची प्रक्रिया
PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment Release Date 2025: eKYC प्रक्रिया केली नसल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीतय
नवी दिल्ली:

जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अथवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment) व्या हप्त्याचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे. (PM Kisan 20th Installment) या योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹2000 जमा होणार आहेत. हा हफ्ता कधी जमा होणार याची उत्सुकता आहे.

(नक्की वाचा: NPS vs Mutual Fund SIP:सेवानिवृत्ती नियोजनासाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)

PM Kisan Yojana 2025 चा 20 वा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 2025) यापूर्वीचा, म्हणजेच 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता येतो. त्यामुळे, आता 20 वा हप्ता जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने हफ्ता कधी जमा होणार याची तारीख जाहीर केली नसली तरी, यासाठीच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे कळते आहे.  

(नक्की वाचा: FASTag Annual Pass: फास्ट- टॅग वार्षिक पास नेमका काय? सामान्यांना कसा फायदा होणार? वाचा A टू Z माहिती)

कोण आहेत या योजनेचे लाभार्थी शेतकरी?  (Who will get PM Kisan 20th installment?)

सरकारकडून फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 हस्तांतरित केले जातील ज्यांची eKYC पूर्ण झाली आहे,  आणि ज्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत (Beneficiary List) आहेत. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यांचे तपशील अचूक दिलेले आहेत, आणि ज्यांचे शेतकरी नोंदणीत (How to check PM Kisan beneficiary list?) नाव आहे, त्यांच्या खात्यात विनाअडथळा रक्कम जमा होईल. कोणतीही माहिती अपुरी असल्यास, पीएम किसानचा पुढील हप्ता अडकू शकतो.  

eKYC अत्यावश्यक आहे?  (Is eKYC mandatory for PM Kisan?)

या योजनेचे लाभार्थी असाल आणि सगळ्या निकषांत बसत असाल तर त्या शेतकऱ्याला eKYC  प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हे अत्यंत महत्त्वाचे असून ही प्रक्रिया झाली नसेल तर  लाभार्थी असूनही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता (PM Kisan Yojana 20th Installment)  हफ्ता मिळणार नाही. eKYC साठी दोन पर्याय आहेत, ओटीपीद्वारे ऑनलाइन पोर्टलवर (Online Portal) किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर (CSC Centre) जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.  

लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत कसे तपासायचे ? (How to check PM Kisan beneficiary list?)

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अपडेट केली जात असते. यातून काही शेतकऱ्यांची नावे वगळली जातात. त्यामुळे लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते. हे नाव कसे तपासायचे ते पाहूयात.  

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • 'Beneficiary List' वर क्लिक करा.
  • राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • 'Get Report' वर क्लिक करा.
  • यादीत आपले नाव तपासा.

योजनेच्या लाभासाठी बँक तपशील अपडेट ठेवा (How to update bank details for PM Kisan?)

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana 2025) लाभार्थ्यांच्या खात्यात सरकार पैसे जमा करत असते, मात्र अनेकदा बँकेचा तपशील चुकीचा असल्याने ही रक्कम लाभार्थ्यांना मिळत नाही  IFSC कोड चुकीचा असणे, खातं बंद असणे, आधार लिंक नसणे अशा कारणांमुळे तुम्हाला लाभाची रक्कम मिळण्यास मुश्कील होऊ शकते. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक तपशील पडताळून पाहणे गरचेचे असून काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करणे गरजेचे आहे.  

लाभार्थ्यांनी फार्मर रजिस्ट्रीमध्ये नाव तपासणे गरजेचे (What is Farmer Registry for PM Kisan?)

या योजनेच्या लाभार्थ्यांना फार्मर रजिस्ट्रीमध्ये  (Farmer Registry) आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.  यासाठी तुम्ही mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा Farmer Registry App डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन फॉर्म भरून माहिती अपडेट करणंही शक्य आहे.

किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत किती हफ्ते मिळाले?  (How many installments received in PM Kisan?)

किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्ते मिळाले आहेत. दरवर्षी सरकार शेतकऱ्यांना ₹6,000 ची रक्कम तीन हप्त्यांमध्ये (एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च) देते. अशा प्रकारे, दर 4 महिन्यांनी ₹2000 चा हप्ता बँक खात्यात जमा करत असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com