जाहिरात

PM Modi Adampur Visit : एकही शब्द न बोलता PM मोदींनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं

पंतप्रधान मोदींच्या आदमपूर एअरबेस भेटीमुळे पाकिस्तानचा हा खोटारडेपणा स्पष्टपणे उघड झाला आहे. हे फोटो पाकिस्तानच्या खोट्या कथेला उत्तर आहेत.

PM Modi Adampur Visit : एकही शब्द न बोलता PM मोदींनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं

पंजाब: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पंजाबच्या आमदपूर एयरबेसला भेट दिली. यावेळी संपूर्ण एअरबेस भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला. यावेळी सैनिकांच्या पाठीमागे दिसत असलेल्या s- 400 मिसाईल यंत्रणेणे सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी पंतप्रधान मोदींनी केलेल्या फोटोसेशनेच पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आमदपूर हा तोच एअरबेस आहे ज्याबद्दल पाकिस्तान खोटे पसरवत होता की त्यांनी तो उद्ध्वस्त केला आहे. एवढेच नाही तर तो असा दावा करत होता की त्यांनी एस-400 नष्ट केले आहे. आता पाकिस्तानने हे चित्र काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. पाकिस्तान आपल्या लोकांना खोटे फोटो दाखवून स्वतःची अब्रु वाचवत होते. पंतप्रधान मोदींच्या आदमपूर एअरबेस भेटीमुळे पाकिस्तानचा हा खोटारडेपणा स्पष्टपणे उघड झाला आहे. हे फोटो पाकिस्तानच्या खोट्या कथेला उत्तर आहेत.

पंतप्रधानांच्या आदमपूर एअरबेस भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान एअरबेसबद्दल खोटे कसे पसरवत होता हे स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत एअरबेसभोवती फिरताना आणि त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. एअरबेसला एकही ओरखडा झालेला नाही. तसेच पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओमध्ये S-400 देखील पाहता येईल. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ पाकिस्तानसाठी एक संदेश आहे.

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

दरम्यान, आदमपूर एअरबेसला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आज सकाळी मी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या सर्व गोष्टींसाठी भारत नेहमीच त्यांचे आभारी राहील."

Listen to the latest songs, only on JioSaavn.com