जाहिरात

PM Modi Speech: 'बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला...', पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुट्ट्यांची मजा घेणाऱ्या निर्दोष नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांच्या मुलांसमोर मारुन टाकणे हा आतंकवादाचा भयंकर चेहरा होता,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi Speech: 'बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला...', पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Speech: पहलगाम हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. भारतीय हवाई दलाने 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही सीमाभागात गोळीबार केला होता. या सर्व घडामोडी घडत असताना पंतप्रधान मोदींनी मात्र अद्याप भाष्य केले नव्हते. अशातच आता पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांना पाकिस्तानला थेट इशारा दिला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

संपूर्ण जगाने देशाचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिले. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेनेचे, सशस्त्र दलांचे, आपल्या गुप्तचर विभागाचे सर्व भारतीयांकडून सलाम करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठी असीम असप्रन दिले. मी त्यांच्या विरतेसाठी, साहस आणि सामर्थ्यसाठी प्रणाम करतो.  २२ एप्रिल रोजी पेहलगाममध्ये आतंकवाद्यांनी जे पाप केले त्याने देश आणि जगभरात खळबळ उडाली होती. सुट्ट्यांची मजा घेणाऱ्या निर्दोष नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांच्या मुलांसमोर मारुन टाकणे हा आतंकवादाचा भयंकर चेहरा होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या ही वेदना असह्य होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी एकजूट झाला होता. दहशतावादाला गाडण्यासाठी आम्ही सैन्याला पूर्ण सूट दिली होती. दहशतवादी संघटना, दहशतवाद्यांना हे कळून चुकले आहे की माता भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम काय असतो. ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नाहीये, ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला:

"दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले म्हणून , भारताना दहशतावद्यांचे अड्डे उद्ध्व्स्त केले. भारताने 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांचे अनेक म्होरके पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत होते. त्या म्होरक्यांना भारताने एका झटक्यात संपवले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान निराशेच्या गर्तेत गेला होता, त्यातूनच त्यांनी दुसरे पाऊल उचलले , भारतावर हल्ला सुरू केला. पाकिस्तानने शाला, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिरे, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आमच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केले, मात्र यातही पाकिस्तानचा बुरखा फाटत गेला, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर तोफ डागली.

करदात्यांची गोपनीय माहिती लीक होत असल्याचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com