लोकसभा निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळेल. एनडीए 400 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास NDTV नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसेल. शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळेल, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एनडीटीव्ही ग्रुपचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, जितके सामान्य नागरिक या क्षेत्रात येतील तितकी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रत्येक नागरिकाच्या मनात जोखीम घेण्याची क्षमता वाढली पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसानंतर म्हणजे 4 जूननंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळेल. शेअर बाजारात आठवडाभर अशी तेजी असेल की शेअर बाजारातील प्रोग्रामरही थकून जातील. भाजपच्या 10 वर्षांतील कार्यकाळात सेन्सेक्सने 25 हजार ते 75 हजारपर्यंतचा शानदार प्रवास केला आहे.
(नक्की वाचा Exclusive : देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे)
इंडिया आघाडीवर निशाणा
इंडी आघाडीमध्ये फोटोसेशनशिवाय काय दिसतं का. इंडी आघाडीच्या पहिल्या फोटोसेशनमध्ये जेवढे चेहरे दिसत होते, तेवढे आता दिसत आहेत का? इंडी आघाडीतील चेहऱ्यांची संख्या आणि दर्जा देखील कमी झाला आहे. लोक येतात फोटो काढतात आणि निघून जातात. त्यांचा काही कॉमन अजेंडा आहे का. निवडणूक प्रचाराची काही स्टटर्जी आहे का, तर नाही. प्रत्येक जण आपआपली डफली वाजवतोय. त्यामुळे यांच्यावर लोकांचा विश्वास बसू शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
(नक्की वाचा Super Exclusive: NDTV च्या खास मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा 'फोर-एस' मंत्र)
आपल्या मुलांचं भविष्य सेट करण्यासाठी इंडी आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील मुलांचं भविष्य तिथे कुठे दिसतच नाही. त्यामुळे मला नाही वाटत, ते देशातील लोकांचा विश्वास जिंकू शकतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.