PM Modi: लोकसभा निवडणूक 2024चे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत आणि काही तासांतच देशामध्ये पुढील सरकार कोणाचे असेल, याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. देशामध्ये 543 जागांवर सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यानंतर 1 जून रोजी आलेल्या एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला. एकाच दिवशी त्यांनी तीन-तीन राज्यांतील जाहीर सभांना संबोधित केले.
सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी 30 मे रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे रवाना झाले होते आणि येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांनी 45 तास ध्यानसाधना केली. 1 जून रोजी संध्याकाळी ते दिल्लीमध्ये परतले आणि पुन्हा विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाले. दरम्यान कन्याकुमारीहून दिल्लीला परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेशी संबंधित त्यांच्या अनुभवांबद्दल एक लेख लिहिला, जो त्यांना आता सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
नक्की वाचा:
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
लोकसभा एग्झिट पोलनंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 2 हजार तर निफ्टीचा नवा विक्रम
Lok Sabha Result : पंतप्रधान मोदी की राहुल गांधी, देशाची गॅरेंटी कुणाला? उद्या होणार फैसला