PM Narendra Modi : पेट्रोल-डिझेल, सोनं खरेदीबाबत PM नरेंद्र मोदींचं देशवासीयांना सर्वात मोठं आवाहन, म्हणाले..

पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्त्रायल आणि इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका भारतालाही बसल्याचं समोर आलंय. या युद्धामुळे देशावर आर्थिक संटक येण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
PM Narendra Modi Speech Today

PM Narendra Modi Speech News :  पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्त्रायल आणि इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका भारतालाही बसल्याचं समोर आलंय. या युद्धामुळे देशावर आर्थिक संटक येण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय. मोदी यांनी देशवासीयांना संबोधीत करताना मोठी आवाहने केली. मोदी म्हणाले, "पेट्रोल आणि डिझेलची बचत करा. कोरोना काळात आम्ही सर्व व्यवस्था सुरु केल्या होत्या. आता परिस्थितीनुसार आपल्याला त्या व्यवस्था पुन्हा सुरु कराव्या लागतील. वर्षभर सोन्याची खरेदी करू नका. आम्ही कोरोना काळात वर्क फ्रॉम होम केलं. ऑनलाई मिटिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्स केल्या. आता या सर्व गोष्टी पुन्हा सुरु करण्याची वेळ आली आहे".

"आज जे संकट आहे, ते पाहता आपल्याला परकीय चलन वाचवण्यावर खूप जास्त भर द्यावा लागेल. कारण जगात पेट्रोल-डिझेल खूप जास्त महाग झालं आहे. पेट्रोल-डिझेल इंधन खरेदीमुळे आपलं परकीय चलन खर्च होत आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की, पेट्रोल-डिझेलची बचत करून आपल्याला परकीय चलन वाचवायचं आहे",असंही मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> CM विजय यांचं भाषण सुरु होतं, अचानक त्रिशा कृष्णननं असं काही केलं..फिल्म इंडस्ट्रीसह राजकारणात चर्चा, VIDEO

PM मोदींनी त्या संकल्पाबाबत केलं मोठं विधान

मोदी पुढे म्हणाले की, "जग खूप मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे.कोविडच्या संकटानंतर युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. ज्यामुळे जगभरातील समस्या आणखी वाढल्या. अन्नपुरवठा, इंधन आणि धान्यावर मोठा परिणाम झाला. मागील पाच-सहा वर्षांपासून आमचं सरकार या समस्यांवर उपाय काढण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. युद्धामुळे जगभरात पेट्रोल,डिझेल,गॅस आणि धान्याच्या किंमती वेगाने वाढत आहेत. भारतात तेलाचं मोठं प्रोडक्शन नाहीय. आपल्याला दुसऱ्या देशांकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोल,डिझेल आणि गॅसची आयात करावी लागत आहे."

Advertisement

नक्की वाचा >> Amravati News: 15 मित्रांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा, 2 सख्ख्या भावंडांसह एकापाठोपाठ 4 जणांचा जीव गेला

"जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करायचा"

"या जागतिक संकटामुळे आपल्याला काही संकल्प करावे लागणार आहेत. त्यांना विश्वासाने पूर्ण करावे लागतील. एक मोठा संकल्प आहे- पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा. ज्या शहरात मेट्रो उपलब्ध आहे. तिथे आपल्याला जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करायचं आहे. जर सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त रेल्वे फ्रेट सुविधांचा वापर करावा लागेल",असंही आवाहन मोदींनी केलं आहे.