PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही गरिबांना खोटी आश्वासनं दिली नााहीत. आम्ही खरा विकास केला आहे. गरिबांचं दु:ख , सामान्य माणसांचा त्रास, मध्यवर्गीयांची स्वप्न असंच कळत नाहीत. त्यासाठी ध्यास लागतो आणि मला दु:खानं सांगावं लागतंय की काही लोकांमध्ये तो नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'आम्ही 12 कोटींपेक्षा जास्त शौचालयं बनवली. त्यामुळे आई आणि बहिणींच्या अडचणी दूर झाल्या. काही जणांचा फोकस जकूजीवर आहे. स्टायलिश शॉवरवर आहे. पण, आमचा फोकस प्रत्येक घरी पाणी पोहचवण्यावर आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला असल्याचं मानलं जात आहे.
पंतप्रधानांनी पुढं सांगितलं, 'जेव्हा जास्त ताप वाढतो त्यावेळी लोकं काहीही बोलतात. पण जेव्हा हताशा- निराशा पसरते त्यावेळी देखील खूप बोलतात. 'इतके लाख घोटाळे, इतके लाख घोटाळे' यापूर्वी वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स असतं. 10 वर्ष झाली. पण, घोटाळे झाले नाहीत. त्यामुळे लाखो कोटी वाचले आहेत. ते लोकांच्या सेवेसाठी वापरले जात आहेत.
( नक्की वाचा : NDTV Exclusive : टॅक्सनंतर आता टोलमध्येही मिळणार सवलत! गडकरींनी दिले मोठे संकेत )
'मिस्टर क्लीन पंतप्रधान'
मोदी पुढं म्हणाले की, 'आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन म्हणण्याची सवय झाली होती. त्यांनी एक अडचण ओळखली होती. त्यांनी सांगितलं होतं की, 'दिल्लीमधून एक रुपया निघतो त्यामधील 15 पैसे गावापर्यंत पोहोचतात.
त्यावेळी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत एकाच पक्षाचं राज्य होतं. पण, अद्भूत हाथ सफाई होती. 15 पैसे कुणाकडं जात होते ते तुम्ही सहज ओळखू शकता. देशानं आम्हाला संधी दिली. आम्ही उत्तर शोधण्याचं काम केलं. आमचं मॉडेल बचत आणि विकास आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आहे.