प्रज्वल रेवन्नाच्या टायमिंगची चर्चा, ज्योतिषाच्या सल्ल्याने आत्मसमर्पणासाठी 31 मे तारीख निवडली?

Prajwal Revanna Case : प्रज्वल रेवन्नाच्या आत्मसमर्पणाच्या घोषणेनंतर अफवांचा बाजार गरम झाला आहे. प्रज्वलने निवडलेला दिवस आणि वेळ यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणातील कथित मास्टरमाईंड प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी सकाळी भारतात दाखल होणार आहे. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता प्रज्वल रेवन्ना SIT समोर आत्मसमर्पण करणार आहे. प्रज्वल रेवन्ना जर्मनीची राजधानी म्युनिक येथून गुरुवारी निघणार आहे. त्यांनतर भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी तो भारतात पोहोचणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रज्वल रेवन्नाच्या आत्मसमर्पणाच्या घोषणेनंतर अफवांचा बाजार गरम झाला आहे. प्रज्वलने निवडलेला दिवस आणि वेळ यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. रेवन्ना कुटुंबियांचा ज्योतिषांच्या सल्ल्याने काम करण्याची पार्श्वभूमी यावरुन प्रज्वलने 31 मे चा दिवसच का निवडला यावरुन अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. 

(नक्की वाचा- भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू)

ज्या चर्चा सुरु आहेत, त्यावरुन असं समोर येत आहे की, ज्योतिषांच्या मते 31 मे रोजी सकाळी आत्मसमर्पण करणे रेवन्नासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे प्रज्वलला लवकर जामीन देखील मिळू शकतो. त्यामुळे प्रज्वलने हा दिवस आणि ही वेळ निवडल्याचं बोललं जात आहे. 

प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना आणि देवेगौडा कुटुंबावर नेहमीच ज्योतिषांचा प्रभाव असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या अशा चर्चांना बळ मिळत आहे. 

Advertisement

एचडी रेवन्ना लिंबू घेऊन विधानसभेत

2018 साली ज्यावेळी जेडीएस आणि काँग्रेसचं आघाडी सरकार सत्तेत होतं, त्यावेळी कुमारस्वामी मुख्यमंत्री होते. तर एचडी रेन्ना कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी एचडी रेवन्ना हातात लिंबू घेऊन विधानसभेत यायचे, कारण तसा सल्ला त्यांना ज्योतिषाने दिला होता, असं बोललं जातं. असं न केल्यास कुमारस्वामी सरकार आणि एचडी रेवन्ना यांचं सरकार धोक्यात येईल. या कृतीवर भाजपने त्यावेळी आक्षेप नोंदवला होता. त्यावेळी कुमारस्वामी यांनी रेवन्ना यांची पाठराखण करत भाजपवर हल्लाबोल केला होता. 

(नक्की वाचा- माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रेटींनी शेअर केलेल्या 'All Eyes On Rafah' फोटोचा अर्थ काय?)

घराची भिंत उंच केली होती

कुमारस्वामी ज्यावेळी 2006 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते त्यावेळी त्यांनी आपल्या सरकारी बंगल्याच्या भिंतीची उंची वाढवली होती. ज्योतिषाने त्यांना असा सल्ला दिल्याची त्यावेळी चर्चा होती. याशिवाय त्यांनी बंगल्यातच गोशाळा देखील सुरु केली होती. याबाबत त्यावेळी कुमारस्वामी यांना विचारलं असता, त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या शुभचिंतकांच्या सल्ल्यानुसार मी हे करत आहे. 

Advertisement

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यावर देखील ज्योतिषशास्त्राचा प्रभाव होता. ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय देवेगौडा कोणतंच पाऊल उचलत नसल्याचं बोललं जायचं. याच सर्व गोष्टींमुळे प्रज्वल रेवन्नाच्या आत्मसमर्पणाच्या टायमिंगची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

Topics mentioned in this article