जाहिरात

भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू

निवडणुकीच्या प्रचारासाठी करण सिंह गोंडा येथे आलो होते. त्यावेळी करण सिंह यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली.

भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या कैसरगंजचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पूत्र आणि भाजप लोकसभेचे उमेदवार करण सिंह यांच्या ताफ्यातील कारने तीन जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा येथील करनैलगंज-हुजूरपूर मार्गावरुन करण भूषण यांचा ताफा जात होता. ताफ्यातील एका कारने एका दुचाकीला जोरदार धडक मारली. कारधी धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. 

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात

बृजभूषण यांना डावलून करण सिंह यांना कैसरगंज येथून लोकसभा निवडणुकीची तिकीट देण्यात आलं आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी करण सिंह गोंडा येथे आलो होते. त्यावेळी करण सिंह यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर गाडीने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला एकजण जखमी आहे. अपघातानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मतदाना आधी निवडणूक आयोगाची चिंता, विधानसभेची तयारी कशी?
भाजप खासदार बृजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना उडवलं; दोघांचा मृत्यू
What is importnace of Lok Sabha Speaker and finance minister TDP JDU Chandrababu Naidu Nitish Kumar PM Modi
Next Article
Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय?