सिंघम चित्रपटात जयकांत शिखरे नावाच्या खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी बुधवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचा प्रचार प्रसार केल्याप्रकरणी त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. हैदराबादमधील सायबराबादमधील ईडी कार्यालयात त्यांनी हजेरी लावली होती. या प्रकरणात प्रकाश राज यांच्या व्यतिरिक्त 29 बड्या कलाकारांची नावे सामील आहेत. प्रकाश राज यांनी चौकशीबद्दल बोलताना म्हटले की त्यांनी बेटींग अॅपची जाहिरात केली होती मात्र त्यांनी त्यासाठी एक रुपयाही घेतला नव्हता.
( नक्की वाचा: बापरे! नर्सरीची फी अडीच लाख रुपये )
जाहिरातीसाठी पैसा घेतला नाही
प्रकाश राज यांनी चौकशीनंतर बोलताना म्हटले की, "मनी लॉण्ड्रींग आणि बेटींग अॅप प्रकरणी मी इथे आलो होते. 2016 साली मी ही जाहिरात केली होती मात्र त्यानंतर नैतिकतेमुळे ही जाहिरात करणे मी बंद केले. मी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की या जाहिरातींसाठी मला पैसा मिळालेला नाही कारण मला हे पैसे घेण्याची इच्छा नव्हती. अधिकाऱ्यांनी सगळा तपशील नोंदवला आणि चौकशी संपली. अधिकारी त्यांचे काम करत आहे आणि मी त्यांना चौकशीत सहकार्य करत आहे."
( नक्की वाचा: कमाल आहे राव!'डॉग बाबू' नंतर आता मोनालिसाचं रहिवासी प्रमाणपत्र आलं समोर )
प्रकरण नेमके काय आहे ?
हे प्रकरण जंगली रमी नावाच्या App शी निगडीत प्रकरण आहे. या बेटींग अॅपची जाहिरात करत त्याचा प्रचार प्रसार केल्याचा आरोप दक्षिणेकडच्या नामवंत कलाकारांवर करण्यात आला आहे. या जाहिरातींसाठी कलाकारांसोबत झालेल्या आर्थिक देवाण घेवाणीची ईडी चौकशी करत आहे. विजय देवरकोंडा, प्रणिता, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, राणा डुग्गुबाटीसारख्या कलाकारांची ईडी चौकशी करणार आहे.