जाहिरात

Nursery School Fees: बापरे! नर्सरीची फी अडीच लाख रुपये, सरकारने हस्तक्षेप करण्याची होतेय मागणी

Nursery School Fees: बापरे! नर्सरीची फी अडीच लाख रुपये, सरकारने हस्तक्षेप करण्याची होतेय मागणी
मुंबई:

खासगी शाळेतील शिक्षण हे दिवसेंदिवस महाग होत चालले असून, शालेय शिक्षणासाठीचा खर्च सर्वसामान्य सोडाच उच्च मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. अनुराधा तिवारी या विविध समस्यांबद्दल आपली मते मांडत असतात. त्यांनी X वर एक इमेज पोस्ट केली आहे. यामध्ये नर्सरीपासून पाचवीपर्यंतच्या शिक्षणासाठी येणारा खर्च दाखवण्यात आला आहे. ही शाळा कोणती आहे ते कळू शकलं नसलं तरी शिक्षणाच्या नावाखाली पालकांची ज्या पद्धतीने लूट सुरू आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. 

किती आहे नर्सरीची फी?

  1. ट्यूशन फी प्रत्येक टप्प्यात- 47750.00 रुपये, 
  2. प्रवेश शुल्क- 5000.00 रुपये 
  3. इनिशिएशन फी प्रत्येक टप्प्यात- 11250.00 रुपये
  4. याव्यतिरिक्त, 10000.00 रुपये सुरक्षा ठेव देखील आहे जी refundable असेल. 
  5. एकूण चार टप्प्यांमध्ये (जून, सप्टेंबर, डिसेंबर, मार्च) ही फी भरण्याची सोय 
  6. प्रत्येक टप्प्याची फी अनुक्रमे- 74000.00, 59000.00, 59000.00 आणि 59000.00 रुपये.
  7.  एकूण वार्षिक शुल्क- 2,51,000 रुपये.

अनुराधा तिवारी यांनी X वर जी इमेज पोस्ट केली आहे त्यानुसार माध्यमिक पूर्व1 (पीपी 1) आणि माध्यमिक पूर्व 2 (PPII) वर्गांसाठी एकूण वार्षिक शुल्क 2,72,400  रुपये इतके आहे.  पहिली आणि दुसरीसाठीचे वार्षिक शुल्क 2,91,460 रुपये इतके आहे. तर तिसरी ते पाचवीसाठीची फी 3,22,350 रुपये आहे. 

( नक्की वाचा: अमेरिकतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम पुरवणार, आशिष शेलार यांचे आश्वासन )

तिवारी यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून यातील एकाने म्हटले आहे की, सरकारने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे. 

अन्य एकाने म्हटलंय की,काही पालक हे असले फोटो आपले स्टेटस दाखवण्यासाठी व्हॉटसअपवर शेअर करतात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com