जाहिरात

Pratik Yadav: शरीरावर 6 जखमा, रक्ताच्या गाठी! प्रतीक यादव यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, धक्कादायक खुलासे

प्रतीक यादव हे राजकारणापासून दूर राहून स्वतःचा व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत होते.

Pratik Yadav: शरीरावर 6 जखमा, रक्ताच्या गाठी! प्रतीक यादव यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला,  धक्कादायक खुलासे
  • प्रतीक यादव यांचा मृत्यू रक्तातील गाठ (ब्लड क्लॉट) तयार झाल्याने कार्डियक अरेस्टमुळे झाला
  • त्यांच्या शरीरावर एकूण सहा जखमांच्या खुणा आढळल्या असून त्यातील तीन जखमा मृत्यूपूर्वीच्या होत्या
  • मृत्यूच्या एक दिवस आधी तीन जखमा झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी त्या सर्व जखमा मृत्यूपूर्वी झाल्याचं सांगितलं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव (वय 38) यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळी संशयास्पद परिस्थितीत त्यांचे निधन झाले. त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि शरीरावरील जखमांबाबत महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या. त्यामुळे त्यांच्या पोर्टमार्टम रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

मृत्यूचे नेमके कारण काय?
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, प्रतीक यादव यांच्या शरीरात रक्ताची गाठ (Blood Clot) तयार झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. ही रक्ताची गाठ शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागात पोहोचली. ज्यामुळे आर्टरी आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला. या प्रक्रियेनंतर त्यांना 'कार्डियक अरेस्ट' आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत मृत्यूचे कारण 'मॅसिव्ह पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिज्म'मुळे आलेला 'कार्डिओरेस्पिरेटरी कोलॅप्स' असे सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा - Prateek Yadav : मुलायम सिंहाचा गुप्त मुलगा, बंडखोर सुनेचा नवरा आणि अकाली निधन प्रतीक यादवचं आयुष्य कसं होतं?

शरीरावर 6 जखमांच्या खुणा
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रतीक यांच्या शरीरावर एकूण 6 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामध्ये छातीचा उजवा भाग, उजवा हात, कोपर आणि मनगटावर गंभीर जखमा (Contusion) आहेत.  त्याखाली रक्त साकळल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार, यातील तीन जखमा 5 ते 7 दिवस जुन्या आहेत. तर उर्वरित तीन जखमा मृत्यूच्या एक दिवस आधीच्या आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की या सर्व जखमा मृत्यूच्या आधीच्या (Antemortem) आहेत.

नक्की वाचा - Prateek Yadav: खळबळजनक! अखिलेश यादव यांच्या भावाचा मृत्यू; संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

व्हिसेरा आणि पुढील तपास
मृत्यूचे अधिक सखोल कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी नमुने सुरक्षित ठेवले आहेत. तसेच, रासायनिक विश्लेषणासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. प्रतीक यादव हे राजकारणापासून दूर राहून स्वतःचा व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत होते. त्यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजप नेत्या असून सध्या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com