Prateek Yadav Death: उत्तरप्रदेशचे नेते, माजी मुख्यमंत्रीमुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र आणि अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे निधन झाले आहे. आज (१३ मे) लखनौ येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचे वृत्त आहे. उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेरीस त्यांचे निधन झाले. प्रतीक यादव यांना नेमका कोणता आजार होता, हे अद्याप कळलेले नाही. प्रतीक यादव यांच्या निधनाची बातमी पसरताच नेते आणि नातेवाईकांनी लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे.
अखिलेख यादव यांच्या भावाचे निधन
समोर आलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचे निधन झाले आहे. प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजपच्या नेत्या आहेत. प्रतीक हे मुलायम सिंह यादव यांचे दुसरे पुत्र आहेत. अलीकडेच प्रतीक यादव आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या.
पतीक यादव हे भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते आणि ते व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रात कार्यरत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव घरी झोपले असताना त्यांची प्रकृती खालावली सकाळी ६:१५ च्या सुमारास त्यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेत आणण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतीक यादव यांना तातडीने रुग्णालयात नेले, त्यावेळी त्यांची पत्नी अपर्णा यादव त्यांच्यासोबत नव्हत्या. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव घरी झोपले असताना त्यांची प्रकृती खालावली.
शवविच्छेदन अहवालानंतर होणार खुलासा
या बाबत कुटुंबीयांकडून कोणतीही औपचारिक पुष्टी देण्यात आलेली नाही. मृत्यूचे कारणही अस्पष्ट असून अधिक माहिती येणे बाकी आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पंचनामा (चौकशी) केला जात असून, डॉक्टरांचे एक पथक लवकरच शवविच्छेदन करणार आहे. सूत्रांनुसार, प्रतीक यादव यांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world