1 hour ago

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

May 14, 2025 20:57 (IST)

LIVE Updates: मिनी बस उलटून भीषण अपघात! 23 प्रवासी जखमी

पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाउंडला धडकून 32 सीटर मिनी बस पलटी झालीय....यामध्ये लग्नासाठी निघालेल्या बसमधील 23 प्रवासी जखमी झाले आहेत.यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.. जखमींवर खेडशिवापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

        

भोर येथून बोपगाव येथील कानिफनाथ मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या कार्यक्रमासाठी या बसमधून 32 वऱ्हाडी निघाले होते.. शिंदेवाडी-पठारवाडी ते बोपगाव या दुर्गम रस्त्यावर चतुर्मुख महादेव मंदिराच्या पायथ्याशी आल्यावर या बसचा अपघात झाला.या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कंपाउंड केले आहे.त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकली.

May 14, 2025 20:26 (IST)

LIVE Updates: ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवण्याची अफवा, एकाला अटक

अफवा पसरवणाऱ्या ससून रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला पोलिसांकडून अटक 

ससून रुग्णालयाचे डीन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयात बॉम्ब असल्याची खोटी माहिती सुरक्षा रक्षकाने दिली होती 

रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईल वरूनच मेसेज पाठवत पसरवली अफवा 

पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत सुरक्षारक्षकाला पोलिसांनी केली अटक 

अफवा पसरल्याने ससून रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण

May 14, 2025 17:32 (IST)

LIVE Update: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, 5 दिवसातील 6 वा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूची घटना घडली. चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून कचराबाई अरुण भरडे (54) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. तेंदूपत्ता गोळा करतांना पतीसमोरच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत. पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला, या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे , चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 6 महिलांचा गेल्या 5 दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू च्या घटना घडल्या आहेत. या घटनेने अजून एकदा तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

May 14, 2025 17:31 (IST)

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या रिसोड,वाशिम शहरात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड,वाशिम शहरासह अनेक ठिकाणी जोरदार मानसूनपूर्व पाऊस सुरु.. 

मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात 

होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामांना येणार वेग..

जिल्ह्यात हवामान खात्याने पुढील 20 तारखे पर्यंत हा माणुसपूर्व पाऊस सुरू राहिणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे...

Advertisement
May 14, 2025 17:30 (IST)

Latur News: लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

 लातूर शहरासह आजुबाजूच्या परिसरात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली... गेल्या अर्ध्या तासांपासून हा पाऊस अद्यापही सुरू आहे... शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, त्यातच दुपारच्या सुमारास या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. लातुरात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

May 14, 2025 16:25 (IST)

LIVE Updates: नागपुरात बच्चू कडू यांच्या प्रहारचे आंदोलन, ट्रॅफिक पार्क परिसरात रक्तदान

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे  शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी आज नागपुरात रक्तदान आंदोलन घेण्यात आले.. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी रक्तदान आंदोलन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या धरमपेठ परिसरातील निवासस्थानासमोर आंदोलनाची त्यांनी परवानगी मागितली होती..

मात्र, तिथे परवानगी नाकारण्यात आल्या नंतर, नजिकच्या ट्रॅफिक पार्क समोर रक्तदान आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा  सात बारा कोरा करा, आम्ही तुम्हाला रक्त देतो, तुम्ही आम्हाला कर्जमाफी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली..

Advertisement
May 14, 2025 16:22 (IST)

LIVE Updates: पोलीस चकमकीत खात्मा झालेल्या 20 नक्षलवाद्यांची ओळख पटली

गेल्या काही दिवसांत विजापूरच्या सीमावर्ती भागात झालेल्या पोलिस-नक्षलवादी चकमकीत सापडलेल्या नक्षलवाद्यांच्या मृतदेहांपैकी आतापर्यंत एकूण 20 नक्षलवादी मृतदेहांची ओळख पटली आहे.

नक्षलवाद्यांच्या ओळख पटलेल्या 20 मृतदेहांपैकी ११ मृतदेह शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

चकमकीत सापडलेल्या उर्वरित 11नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह देखील कुटुंबियांना सुपूर्द केले जातील.

May 14, 2025 16:21 (IST)

LIVE Updates: अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नवा प्रशासक मिळाला

- अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नवा प्रशासक मिळाला 

- संतोष बिडवई यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती 

- सहकारी संस्था नाशिकचे विभागीय सहनिबंधक होते बिडवाई 

- प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रशासक पद होते रिक्त

Advertisement
May 14, 2025 15:08 (IST)

Pune News: पुण्यात बर्निग कारचा थरार

पुण्यातील वाघोली मध्ये  द बर्निंग कार

वाघोली परिसरात मध्यरात्री बर्निंग कारचा थरार 

पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली परिसरात घडली घटना 

 

अहिल्या नगर कडून पुण्याकडे जाताना वाघोली जवळ चालू कारने अचानक पेट घेतल्याने उडाली एकच खळबळ 

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी नाही 

मात्र आगीत कार जळून पूर्णपणे खाक 

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

May 14, 2025 13:58 (IST)

LIVE Updates: 'ऑपरेशन सिंदूर'साठी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत अभिनंदन

'ऑपरेशन सिंदूर'साठी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत अभिनंदन. 

पंतप्रधान मोदी आणि तिन्ही दलांचे सर्व मंत्र्यांनी केले अभिनंदन 

पाकिस्तानविरोधातील केलेल्या कारवाईबद्दल बैठकीत तिन्ही दलाचा गौरव करण्यात आला.

अँकर: ‘ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सशस्त्र दलांचे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

पाकिस्तानविरोधात भारताने कडक पाऊल उचलले आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले, या संपूर्ण कारवाईचं कौतुक करण्यात आलं आहे. दहशतवादविरोधात भारताची भूमिका ठाम असल्याचा संदेश यातून गेला आहे.

May 14, 2025 12:29 (IST)

Live Update : तिन्ही दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

तिन्ही दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट 

ऑपरेशन सिंदूरबद्दल दिली माहिती

दहशतवादाविरुद्ध भारताच्या कारवाईला जबरदस्त यश मिळाल्यामुळे राष्ट्रपतींनी सशस्त्र दलांच्या शौर्यचे कौतुक केले.

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

May 14, 2025 11:37 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक सुरू 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित

May 14, 2025 10:35 (IST)

Live Update : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवली

जयशंकर यांना आधीच झेड श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यात ३३ कमांडो होते. आता त्यांच्या सुरक्षेत बुलेटप्रूफ वाहनाचा समावेश करण्यात आला आहे.

CRPF कमांडो परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षा जबाबदारी सांभाळत आहेत - सूत्र

May 14, 2025 10:08 (IST)

Live Update : भूषण गवई यांचा शपथविधी सोहळा...

भूषण गवई यांच्या शपथविधी सोहळ्याचाला सुरुवात...

May 14, 2025 09:40 (IST)

Live Update : पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकर यांनी दिला राजीनामा

जमिनीच्या व्यवहारात बनावट दस्त सादर केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल असून यामुळे दीपक मानकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मंजूर करण्याची विनंती केली आहे 

जमिनीच्या व्यवहारातून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी  दीपक मानकर यांच्या गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू आहे

May 14, 2025 09:40 (IST)

Live Update : माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार

दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर होणार भेट

काल काही कारणास्तव भेट झाली नव्हती,जी आज होणार

तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला असून त्या ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत आहेत

तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून होईल

May 14, 2025 08:13 (IST)

Live Update : माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्याअध्यक्षपदी नियुक्ती

माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती

May 14, 2025 08:10 (IST)

Live Update : कोल्हापुरात फुटबॉलच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूरची थीम

कोल्हापुरात फुटबॉलच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूरची थीम खेळाडूंना प्रेरणादायी ठरतोय.. यंदाच्या शारंग चषकमध्ये ही थीम केलीये. छेडेंगे नही तो छोडेंगे नही असा संदेश देखील या थीममधून दिलेला आहे. या ऑपरेशन सिंदूरमधून खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि सैनिकांना सॅल्यूट म्हणून ही थीम राबवल्याच स्पर्धेच्या आयोजकांकडून सांगण्यात आलं. छत्रपती शाहू स्टेडियम येथील मैदानावर ही थीम केलीये. प्रत्येक हंगामात इथं होणारे फुटबॉल सामने पाहण्यासाठी कोल्हापूरकर आवर्जून हजेरी लावत असतात. मात्र ऑपरेशन सिंदूरच्या थीममूळे शारंग चषक चर्चेत आहे. 

May 14, 2025 07:44 (IST)

Live Update : अकोल्याच्या काटेपूर्णा अभयारण्यात 370 च्या वर वन्य प्राण्यांची नोंद..

वैशाख पौर्णिमे म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातील 10 कृत्रिम पाणवठ्याजवळील मचान वर बसुन निसर्गनुभवाचा चित्तथरारक आनंद निसर्गप्रेमींनी घेतला. या वेळी बीबट्याच्या डरकाळी अस्वल, चितळ, सांबर यासारख्या विविध वन्यप्राण्यांचे दर्शन निसर्गप्रेमीना झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी वन्य प्राणी गणने मध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव अधिकाऱ्यांसह निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता. काटेपूर्णा अभयारण्यातील 10 कृत्रिम पानवट्यांवर 370 च्या वर वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली..

May 14, 2025 07:44 (IST)

Live Update :30 हजाराची लाच घेताना महावितरणाचा अधिकारी जाळ्यात

30 हजाराची लाच घेताना इचलकरंजीतील महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात