जाहिरात
1 day ago

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील शैव आणि वैष्णव यांच्या 13 आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखांची आज घोषणा होणार असून इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत

बनावट नोटा व्यवहार प्रकरणात चौघांना अटक

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी ते कोळवण फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए वर फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीचा मोठा प्रकार उघडकीस आला. दोन लाख रुपयांच्या खऱ्या चलनाच्या मोबदल्यात सात लाख रुपये बनावट नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आंबोलीतील मुख्य धबधबा ठिकाणी शनिवार रविवारी पाच वाजल्यानंतर पर्यटकांना मज्जाव

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. 'ड्रंक अँड ड्राईव्ह', 'हेल्मेट सक्ती' त्याची प्रामुख्याने अंमलबजावणी केली जातेय. तर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सायंकाळी पाचनंतर मुख्य धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट अशा ठिकाणी शनिवार आणि रविवार सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे. तसेच सर्व स्टॉल पाच वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

श्री संत गजानन महाराजांची पालखी उद्या सकाळी पंढरपूर साठी होणार मार्गस्थ

बुलढाण्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी उद्या सकाळी सात वाजता शेगाव वरून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे, 700 वारकरी, ध्वज पताका टाळ मृदंग घेऊन अश्व आणि गजासह पायदळ वारीमध्ये सहभागी होणार आहेत, 33 दिवसाचा प्रवास करून 4 जुलै रोजी पालखी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.. पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन 9 जुलैपर्यंत पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे, तर 10 जुलै रोजी पुन्हा शेगाव साठी दिंडी मार्गस्थ होणार आहे.. शेगाव गजानन महाराज मंदिरातून पालखी मार्गस्थ होण्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पुण्यातील साखर संकुलात अजित पवार आणि शरद पवारांच्या बैठकीला सुरुवात

पुण्यातील साखर संकुलात अजित पवार आणि शरद पवारांच्या बैठकीला सुरुवात. AI संदर्भात पुण्यात महत्त्वाची बैठक बैठकीला अजित पवार ,शरद पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती. पुण्यातील साखर संकुलात पार पडत आहे महत्त्वाची बैठक.  बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूच्या खुर्चीवर

Live Update : पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची नियुक्ती

पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची नियुक्ती 

पुणे शहर राष्ट्रवादीला दोन शहराध्यक्ष

पुणे शहर पूर्वला सुनील टिंगरे तर पश्चिमला सुभाष जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती

थोड्याच वेळात होणार ऑफिशियल घोषणा 

दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर पुण्याचा राष्ट्रवादीच शहराध्यक्षपद होत रिकामं 

पण अजित पवारांनी सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती

Live Update : छत्रपती संभाजीनगर दरोड प्रकरणात आणखी मोठी अपडेट

छत्रपती संभाजीनगर दरोड प्रकरणात आणखी मोठी अपडेट

संतोष लड्डाचा मित्र बाळासाहेब इंगोलेचा सासरा आणि बायकोला अटक

बीडच्या आंबेजोगाईमधून पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी आठ लाख रुपये केले जप्त

भारत कांबळे असे इंगोलेच्या सासऱ्याचं नाव

आत्तापर्यंत दरोड प्रकरणात 12 आरोपी अटक

Live Update : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा जाहीर, कधीपासून होणार सुरुवात?

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा जाहीर, कधीपासून होणार सुरुवात?

31 ऑक्टोबर 2026 दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपासून कुंभमेळाला होणार सुरुवात

2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे

31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभस्नान होणार आहे

11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या शाही स्नान म्हणजेच अमृत स्नान होणार आहे.

Live Update : मनमाडमध्ये तरुण चढला रेल्वे ब्रिजवर, प्रशासनाने दोन तासांनी तरुणाला खाली उतरवलं

नाशिकच्या मनमाड  रेल्वे जंक्शन स्थानक एका तरुणाने चक्क रेल्वेच्या ब्रिजवर चढून बसला.त्यातच खाली काही अंतरावर खाली रेल्वे उच्च दाबाची ओव्हर हेड वायर असल्याने एकच गोंधळ उडाला. नेमका हा तरुण कोण? कश्यासाठी वर  चढला याबाबत कोणालाच काहीच माहिती नव्हती, सुमारे दोन तास हा तरुण ब्रीजवर बसून होता. अखेर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस व प्रवाशांनी त्या तरुणाची मनधरणी करून त्याला बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.दरम्यान सदर तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली.

Live Update : पुण्यातील सदाशिव पेठेतील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अपघात प्रकरणी नवी माहिती

पुण्यातील सदाशिव पेठेतील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अपघात प्रकरणी नवी माहिती

चालकाला गाडी चालवता येत नसताना गाडी हातात दिली

नाथसाई हॉटेलच्या मालकाची माहिती 

घटना कशी घडली याचे तपशिल 

अपघात केलेल्या तरूणाने आधी एका दुचाकी चालकाला धडक दिली

त्याला घाबरून नशेत पळून येत असताना झाला अपघात 

ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय 

दोघा तरुणांना उपस्थित असलेल्या लोकांनी केली मारहाण

Live Update : शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा पवार गटात प्रवेश

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील 100 मनसेचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत 

शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात हे पक्षप्रवेश होत आहेत 

मनसे सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत

Live Update : शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा पवार गटात प्रवेश

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील 100 मनसेचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत 

शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात हे पक्षप्रवेश होत आहेत 

मनसे सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत

Live Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात 

गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी 

पुणे वेधशाळे कडून पुणे शहरासह जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट 

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात 

सकाळी सकाळी अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ 

आज पुणे शहरात दिवसभर पावसाची शक्यता

Live Update : विपश्यना केंद्रातून माजी मंत्री धनंजय मुंडे आज पहाटे इगतपुरीहून रवाना

विपश्यना केंद्रातून माजी मंत्री धनंजय मुंडे आज पहाटे इगतपुरीहून रवाना 

- दहा दिवस धनंजय मुंडेंनी केली ध्यानधारणा

Live Update : संभाजीनगरात स्कीलगेमच्या नावाखाली अवैध ऑनलाइन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट

: छत्रपती संभाजीनगरमधे गेल्या काही दिवसापासून स्कील गेमच्या नावाखाली शहरात अवैध ऑनलाइन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट झाला आहे. या लोट्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याच्या तक्रारी  आहेत. अश्याच छावणी परिसरात सुरू असलेल्या  अवैध पाच सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेपाच लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी छावणी भागात कारवाई केली, मात्र  शहरात चौका चौकात बोकाळलेल्या इतर अवैध लॉटरी सेंटरवर कधी कारवाई होईल असे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील सर्व अवैध सेंटर बंद करण्यात यावे अशी मागणी  केली जात आहे.

Live Update : बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर AI कारवाई सुरू

बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर AI कारवाई सुरू 

बेशिस्त वाहन चालकावर शिस्त लावण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर AI टेक्नॉलॉजी 

चार दिवसात 347 बेशिस्तवर टेक्नॉलॉजी वरून कारवाई 

पहिल्या दिवशी 180 बेशिस्त वाहन चालकावर कारवाई झाली त्यानंतर मात्र कारवाईचे संख्या कमी होताना पाहायला मिळाली आहे

Live Update : मालेगावच्या अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायटर वाहने..

नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन मिनी फायटर अग्निशमन वाहन दाखल झाले असून,आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.या मिनी फायटर वाहनामुळे शहरातील अरुंद रस्ते अडचणीच्या ठिकाणी  आग विझविण्यास मदत होणार आहे. 

Live Update : जळगाव शहरातील समता नगर व हरी विठ्ठल नगर भागात डेंग्यूचे 16 संशयित रुग्ण

 जळगाव शहरातील समता नगर व हरी विठ्ठल नगर परिसरात डेंग्यूचे सुहास अवचित रुग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना या सुरू करण्यात आला असून संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या परिसरातील 3 हजार घरांची तपासणी देखील केली जात आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com