जाहिरात

Pushkar mela 2025: मर्सिडीज, रोल्स रॉयल्स पेक्षा ही महागडा आहे 'हा' घोडा, किंमत ऐकून थक्क व्हाल

घोडे उंट यासोबत जवळपास 3 हजार प्राणी या मेळाव्यात आले आहेत.

Pushkar mela 2025: मर्सिडीज, रोल्स रॉयल्स पेक्षा ही महागडा आहे 'हा' घोडा, किंमत ऐकून थक्क व्हाल

Pushkar mela 2025: सध्या एका घोड्याची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. या घोड्याची किंमत मर्सिडीज, रोल्स रॉयल्स या महागड्या गाड्यां पेक्षा ही किती तरी जास्त आहे. त्याच्या किमती मुळे तो चर्चात आला आहे. हा सुंदर आणि रुबाबदार घोटा सध्या अजमेरच्या पुष्कर पशु मेळाव्यात सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे. या घोड्याला पाहिल्या शिवाय कुणी ही पुढे जावूच शकत नाही. शिवाय त्याची किंमत ऐकून सर्व सामान्यांना तर धडकीच भरेल ऐवढी आहे. शाबाज असं या घोड्याचे नाव असून तो पंजाब मधून या मेळाव्यात आला आहे. 

राजस्थानच्या अजमेरमधील पुष्कर येथे सध्या पशुमेळा जारात चालू आहे. देशभरातून येथे वैशिष्यपूर्ण पशू आले आहेत. पंजाब, हरियाणातून घोड्यांचे मालक आपले घोडे इथं घेवून आले आहेत. त्यात पंजाबमधून आलेल्या घोड्यावर सर्वांच्याच नजरा जडल्या आहेत. पंजाबमधील पशुपालक गेरी हे त्याचे मालक आहेत. त्यांच्या घोड्याचे नाव शाबाज आहे. त्याने आतापर्यंत असे सहा शो जिंकले आहेत. या घोड्याची किंमत एक दोन नाही तर तब्बल 15 कोटी रुपये आहे. ही किंमत एखाद्या अलिशान कार पेक्षा ही जास्त आहे. शाबाजचा प्रजनन खर्च 2 लाख रुपये आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अडचणीत! 4285 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार? काय आहे कारण?

हा पशू मेळा देशी-विदेशी पर्यटकांनाही आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. या मेळाव्यात एका दिवसात 1,500 घोडे आले आहेत. घोड्या सोबतच बिकानेरचा एक पशुपालक 800 किलो वजनाची मुर्रा म्हैस घेऊन आला आहे. या म्हशीची किंमत दहा लाख रूपये आहे. शाबाज प्रमाणे या मेळाव्यात आणखी एक घोडा आहे ज्याच्यावर सर्वांच्या नजरा आहे. त्याचे नाव बादल असं आहे. बादल आधीच 285 शिंगरूंचा पिता आहे. या घोड्याची किंमत तब्बल 11 कोटी रुपये आहे.बादलच्या मालकाला मात्र त्याला विकायचे नाही. 

नक्की वाचा - Viral Video: अरे देवा! रस्त्याच्या कडेला भेटले चमत्कारी 'निळे अंडे', 50 दिवसांनी फुटले अन् बाहेर आलं...

घोडे उंट यासोबत जवळपास 3 हजार प्राणी या मेळाव्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक आणि मेळा अधिकारी डॉ. सुनील घिया यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत मेळ्यात 3,021 प्राण्यांची नोंद झाली होती. यापैकी 2,102 घोडे मेळाव्यात आले होते. या शिवाय 917 उंट, 1 गाय आणि 1 म्हैस देखील आली आहे.  राजस्थान शिवाय अन्य राज्यातून 234 प्राणी आले  आहे. सर्वात जास्त घोडे या मेळाव्यात आलेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com