जाहिरात

रॉयल मिशी! मिशांची अनोखी स्पर्धा, सर्वात लहान मिशी 3 फूटाची तर सर्वात मोठ्या मिशीची लांबी....

या स्पर्धेत केवळ सामान्य लोकच नव्हे, तर बँक अधिकारी, रेल्वे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पोलीस, शिक्षकांनी ही भाग घेतला होता.

रॉयल मिशी! मिशांची अनोखी स्पर्धा, सर्वात लहान मिशी 3 फूटाची तर सर्वात मोठ्या मिशीची लांबी....

Pushkar Mela 2025: सध्या पुष्कर मेळ्याची धुम आहे. राजस्थानमध्ये होत असलेल्या या मेळाव्यात जगभरातून पर्यटक एकवटले आहेत.  शुक्रवारी इथं मिशांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राजस्थानची गौरवशाली परंपरा आणि अभिमान दर्शवणाऱ्या या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून  33 स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मारवाड आणि मेवाडसह अनेक जिल्ह्यांतून आलेल्या या स्पर्धकांनी आपल्या अनोख्या मिशांचे (Moustaches) प्रदर्शन केले. विदेश पर्यटकांना तर ते अधिक भावले.

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

    या स्पर्धेत मिशांच्या लांबीचा विक्रम झाला आहे.  या स्पर्धेत मिशांची लांबी 3 फूट ते 6 फूट पर्यंत होती. तर काही स्पर्धकांच्या मिशांची लांबी तब्बल 10 फूट पर्यंत पोहोचली होती. इतक्या मोठ्या आणि देखण्या मिशा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मिशांची लांबी या स्पर्धेतचा चर्चेचा विषय असतो. सर्वात लहान मिशीची लांबी ही तिन फुट मोजली गेली. तर सर्वात मोठ्या मिशीची लांबी ही तब्बल 10 फूट मोजण्यात आली. सहा फूट मिशी असणारे स्पर्धकही या स्पर्धेत होते. 

    नक्की वाचा - Viral Video: RPF जवानाने ट्रेनमध्ये महिलेचा फोन हिसकावला, पण कारण ऐकून सगळे म्हणाले, 'सही किया!'

    या स्पर्धेत केवळ सामान्य लोकच नव्हे, तर बँक अधिकारी, रेल्वे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पोलीस, शिक्षक आणि पीटीआय अधिकारी अशा विविध व्यावसायिक क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांनी व्यासपीठावर आपल्या मिशा वेगवेगळ्या 'स्टाइल'मध्ये सादर करून राजस्थानच्या शाही परंपरेला (Royal Tradition) एक प्रकारे जिवंत रूप दिले. त्यांच्यातील आत्मविश्वास आणि उत्साहामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली.

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com