Raghav Chadha's Resignation from the AAP : दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आप आदमी पक्षाचे तरुण नेते राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आज राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
राघव चड्ढांसह तिघांचा राजीनामा...
आम आदमी पक्षात मोठी फूट पाहायला मिळत आहे. खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी आम आदमी पक्षातून राजीनामा दिला आहे. तिघेही राज्यसभा खासदार आहेत. राघव चड्ढा यांनी दावा केला आहे की, आपमधील दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होत आहेत.
आज २४ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी राघव चड्ढा म्हणाले, आप देशासाठी नाही तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करीत होती. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली स्थापन झालेला हा पक्ष भ्रष्ट व्यक्तींच्या हातात आहे. हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रम साहनी हे देखील भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. ते पुढे म्हणाले, आम आदमी पक्ष मी माझ्या घामाने उभा केला आहे. मी आम आदमी पक्षापासून दूर होत नाही. मी या पक्षाचा फाऊंडिंग मेम्बर होतो. माझ्याशिवाय हा पक्ष जवळून कोणी पाहिली नसेल. मात्र आता आप जुना पक्ष राहिला नाही. मी गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या कामांपासून दूर होतो. कारण मला त्यांच्या गुन्ह्यांत सामील झालो नाही.
काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा यांना हटवून अशोक मित्तल यांना आम आदमी पक्षाचे राज्यसभेत उपनेता बनविण्यात आलं होतं. मात्र आता मित्तल राघव यांच्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्याकडेही छापेमारी झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world