जाहिरात

Raghav Chadha : 'आप'लेपणा संपला, राघव चड्ढांकडे पाठ फिरवली; राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडीची शक्यता

दिल्ली न्यायालयाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य नेत्यांची अबकारी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच जंतर-मंतरवरील रॅली आणि केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतही ते दिसले नाहीत.

Raghav Chadha : 'आप'लेपणा संपला, राघव चड्ढांकडे पाठ फिरवली; राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडीची शक्यता
Raghav Chadha: राघव चड्ढा यांनी गेल्या काही दिवसांत लोकांना भेडसावणारे प्रश्न उचलून धरत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
PTI
  • राघव चड्ढांना राज्यसभेत आपच्या उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती
  • अशोक मित्तल यांची उपनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता
  • राघव चड्ढा पक्षात नाराज असल्याची चर्चा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि पक्षाचे तरुण तडफदार चेहरा मानले जाणारे खासदार राघव चड्ढा यांची पक्षाने राज्यसभेतून मोठी कोंडी केली आहे. चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून तातडीने हटवण्याची विनंती 'आप'ने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून केली आहे. त्यांच्या जागी आता पंजाबमधीलच दुसरे खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लावण्याचा प्रस्ताव पक्षाने दिला असून, या घडामोडीमुळे चड्ढा आणि केजरीवाल यांच्यातील दरी आता अधिकच रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.

नक्की वाचा: दारू, कंडोम, औषध, प्रवास... इराण-अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका!

चढ्ढांची कोंडी करण्याचे मनसुबे ?

पक्षाने सचिवालयाला लिहिलेल्या या पत्रात केवळ पदच नव्हे, तर चड्ढा यांचे संसदेतील अधिकारही मर्यादित करण्याचे संकेत दिले आहेत. यापुढे राज्यसभेत बोलण्यासाठी 'आप'च्या निर्धारित कोट्यातून चड्ढा यांना वेळ दिला जाऊ नये, असेही या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाब आणि दिल्लीच्या राजकारणात पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चड्ढा यांच्यावर झालेली ही कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

नक्की वाचा: विलीनीकरण हवं की नको? शरद पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा निर्णय पक्का झाला

केजरीवालांच्या डोळ्यात खुपायला लागल्याची कूजबूज

गेल्या अनेक महिन्यांपासून राघव चड्ढा यांनी पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांवर बाळगलेले मौन आणि अरविंद केजरीवाल यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांची अनुपस्थिती या कारवाईला कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. विशेषतः अबकारी धोरण प्रकरणात मार्च 2024 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, तेव्हा चड्ढा हे आरोग्याच्या कारणांमुळे परदेशात होते. केजरीवाल सहा महिने तुरुंगात असताना चड्ढा यांनी देशात येण्याचे टाळले आणि केजरीवाल यांची सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांची भेट घेतली. अलीकडेच दिल्ली न्यायालयाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य नेत्यांची अबकारी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतरही चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच जंतर-मंतरवरील रॅली आणि केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतही ते दिसले नाहीत. चड्ढा यांना हळूहळू राज्यांमधील निवडणूक प्रचार आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून बाजूला केले जात असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com