रामराजे शिंदे, नवी दिल्ली
संसदेबाहेर झालेल्या गदारोळाच्या घटनेनंतर राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर राहुल गांधी यांचं निलंबन देखील होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ही नोटीस दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून ते एक्स प्लॅटफॉर्मवर चालवल्याबद्दल विशेषाधिकाराचा भंग दाखल करण्यात आला आहे. हा विषय विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात यावा अशी मागणी देखील लोकसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. जोपर्यंत समिती याप्रकरणी निर्णय घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेतून निलंबित करावे, असे आवाहनही निशिकांत दुबे यांनी केले आहे.
(नक्की वाचा- BJP vs Congress : संसद परिसरातील अभूतपूर्व गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय)
राहुल गांधींवर आरोप काय?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात ओडिशातील बालासोरचे भाजप खासदार प्रताप सारंगी आणि उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील भाजप खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिल्याचा आरोप आहे. भाजप खासदारांनी त्यांच्याविरोधात सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रत्युत्तरात काँग्रेस खासदारांनी तक्रार दाखल केली आहे.
(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)
राहुल गांधी यांच्यावर लावलेली कलमं कोणती?
कलम 109 : हत्येचा प्रयत्न करणे
कलम 117 : जाणून बुजून दुखापत पोहोचवणे
कलम 115 : दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे
कलम 3 (5) : सामुहिक पणे गुन्हा करणे
कलम 125 : खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे
कलम 131 : धक्का देणे आणि भिती घालणे
कलम 351 : धमकी देणे