जाहिरात

Raja Raghuvanshi murder: राजाच्या हत्येपूर्वी काय घडलं? सोनमसोबतचा शेवटचा VIDEO आला समोर

राजा आणि सोनम सकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान शिप्रा होमस्टेवरून निघाले. हा व्हिडिओ सकाळी 9.45 वाजता शूट करण्यात आला होता. तर राजाची हत्या दुपारी करण्यात आली होती.

Raja Raghuvanshi murder: राजाच्या हत्येपूर्वी काय घडलं? सोनमसोबतचा शेवटचा VIDEO आला समोर

Raja Raghuvanshi Murder: हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीने हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. अत्यंत थंड डोक्यांना कट रचून सोनमने राजाला संपवलं. राजाच्या मृत्यूआधी काही तासांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोनम आणि राजा ट्रेकिंग करत होते तेव्हा समोरून येणारे काही लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम आणि राजा ट्रेकिंग करत वर जाताना दिसत आहेत. सोनम पुढे चालत आहे, तर राजा मागे चालत आहे.

राजा आणि सोनम सकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान शिप्रा होमस्टेवरून निघाले. हा व्हिडिओ सकाळी 9.45 वाजता शूट करण्यात आला होता. तर राजाची हत्या दुपारी करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे सोनमने पांढरा शर्ट घातला आहे. तिच्या हातात एक पॉलिथिन पिशवी आहे. ज्यामध्ये कदाचित रेनकोट असेल. राजा तिच्या मागे चालत आहे. 

(नक्की वाचा-  sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न)

VIDEO

काय आहे प्रकरण?

इंदूरचा व्यापारी राजा रघुवंशी याची गेल्या महिन्यात मेघालयात हत्या झाली होती. राजा पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनला येथे आला होता. राजा आणि सोनम बेपत्ता झाल्यानंतर 2 जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील रियात अरलियांग येथे एका दरीत राजाचा मृतदेह आढळला. तर राजाची पत्नी सोनम गायब होती. 

(नक्की वाचा-  Sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनमला जेलमध्ये मिळणार 'या' सुविधा, टीव्ही, जेवण अजून बरच काही...)

सोनमचा हत्या झाली की अपहरन झालं अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र 7 जून रोजी सोनमने जिवंत आत्मसमर्पण केले आणि या प्रकरणाचं सत्य समोर आलं आहे. सोनमनेच पती राजाची हत्या केल्याचं उघड झालं. या हत्येच्या आरोपाखाली  सोनमला अटक करण्यात आली. पोलिसांनी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासह 5 आरोपींना अटक केली. इतर आरोपींमध्ये आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राज एकमेकांना आधीपासून ओळखत होते. हत्येत सहभागी असलेले तिन्ही तरुण कुशवाहाचे मित्र आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे  प्रकरण नसून कट होता. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com