जाहिरात

Kedarnath Helicopter Crash : लेकीसह दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील जयस्वाल पती-पत्नीचा मृत्यू; मुलगा थोडक्यात बचावला

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजकुमार जयस्वाल,  श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

Kedarnath Helicopter Crash : लेकीसह दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील जयस्वाल पती-पत्नीचा मृत्यू; मुलगा थोडक्यात बचावला

केदारनाथमधील गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण जंगलादरम्यान भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 6 भाविक प्रवास करीत होते. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक कुटुंब केदारनाथच्या दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजकुमार जयस्वाल,  श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे. राजकुमार जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल यांचा मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबाकडे थांबला होता. तो यांच्यासोबत केदारनाथला आला नव्हता. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. मात्र या तिघांचाही या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. एका वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलीचं नामकरण करण्यात आलं होतं. राजकुमार आणि श्रद्धा यांनी लेकीचं नाव काशी असं ठेवलं होतं. हे कुटुंब धार्मिक होते. त्यंनी  काशी हिच्या नावाने वणीत काशी शिवमहापुरान प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजनही केलं होतं.

Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

नक्की वाचा - Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

 

यंदाच्या चारधाम यात्रेदरम्याम विविध धामांवर अनेक वेळा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. याशिवाय अनेकदा आपत्कालिन परिस्थितीत हेलिकॉप्टर  लँड करण्यात आलं आहे. नुकतंच रस्त्यावर हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग करण्यात आलं होतं. चारधाम यात्रेच्या सुरुवातीलाही एकदा हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com