जाहिरात

Kempty Falls : धबधब्यामध्ये तरुणांची मजामस्ती, तितक्यात गर्दीत शिरला साप; पर्यटकांची पळापळ... धक्कादायक Video

पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना जंगले आणि धबधब्यांजवळ जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्राण्याजवळ जाणे टाळा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.

Kempty Falls : धबधब्यामध्ये तरुणांची मजामस्ती, तितक्यात गर्दीत शिरला साप; पर्यटकांची पळापळ... धक्कादायक Video

उत्तराखंडमधील मसूरी येथील केम्प्टी फॉल्समध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे सुंदर अशा धबधब्यामध्ये पर्यटक मजा-मस्ती करीत होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक धबधब्यामध्ये उतरले होते. त्यादरम्यान पर्यटकांच्या गर्दीत अचानक एक साप शिरला. यानंतर पर्यटकांमध्ये घबराट पसरली. लोक भीतीने इकडे तिकडे पळू लागले.

वन विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत सापाला पकडले आणि सुरक्षित ठिकाणी सोडले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अलिकडेच, मसुरीच्या बेनोग वन्यजीव अभयारण्यात कोरल नावाच्या विषारी सापाची एक दुर्मीळ प्रजाती आढळून आली आहे. हा साप पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये दिसला आहे. त्याच्या विषारी प्रजातीमुळे, शास्त्रज्ञांसाठी हा एक महत्त्वाचा शोध मानला जात आहे.

काळ आला होता पण... वेगानं वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडणाऱ्या तरुणाला देवदूतानं वाचवलं! पाहा Video

नक्की वाचा - काळ आला होता पण... वेगानं वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडणाऱ्या तरुणाला देवदूतानं वाचवलं! पाहा Video

मसुरीमध्ये दुर्मिळ कोरल साप...


मसुरी आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही  दिवसात साप दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत.  पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना जंगले आणि धबधब्यांजवळ जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्राण्याजवळ जाणे टाळा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे. या घटनांवरून हे स्पष्ट होते की वन्यजीव आणि मानव यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. प्रत्येकाने पर्यावरणाबाबत जागरूक आणि काळजी घेणे आवश्यक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com