जाहिरात

Raja Raghuvanshi: धक्कादायक! सपासप वार, राजा वेदनेने ओरडत होता; सोनम तिथेच सगळं पाहत होती

राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मुख्य सूत्रधार आहे. तिने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर विशाल सिंग चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांना हाताशी घेऊन आपल्याच नवऱ्याला संपवलं. 

Raja Raghuvanshi: धक्कादायक! सपासप वार, राजा वेदनेने ओरडत होता; सोनम तिथेच सगळं पाहत होती
  • मेघालय में राजा रघुवंशी की हत्या में नए खुलासे हो रहे हैं.
  • पुलिस ने इस मामले को ऑपरेशन हनीमून नाम दिया है.
  • राजा की पत्नी सोनम रघुवंशी मुख्य साजिशकर्ता बताई जा रही है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत आणि अजूनही येत आहेत. आता क्राईम सीन रिक्रिएशनने हत्येचे भयानक सत्य समोर आले आहे. मेघालय पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले आहे की राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मुख्य सूत्रधार आहे. तिने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर विशाल सिंग चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांना हाताशी घेऊन आपल्याच नवऱ्याला संपवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

२३ मे २०२५ रोजी शिलाँगच्या सोहरा परिसरातील नोंगरियाट गावाजवळील वेसाडोंग धबधब्याजवळ ही हत्या घडली. क्राईम सीन रिक्रिएशननुसार, विशालने मागून राजाच्या डोक्यावर पहिला प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर राजा रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडला आणि ओरडू लागला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजा मदतीसाठी ओरडत होता. त्यावेळी सोनम तिथेच उभी होती. परंतु पहिल्या हल्ल्यानंतर ती मागे हटली. यानंतर, आनंद आणि आकाशने राजावर आणखी दोन हल्ले केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तिन्ही आरोपींनी मिळून राजाचा मृतदेह दरीत फेकून दिला.

(नक्की वाचा-  sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न)

दुसऱ्या शस्त्राचा शोध सुरू

पोलिसांनी हत्येत वापरलेल्या धारदार शस्त्रांपैकी एक जप्त केले आहे. मात्र एसडीआरएफ मदतीने दुसऱ्या शस्त्राचा शोध अजूनही सुरू आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा हरियाणातील सोनीपत येथील प्रवासी आणि ब्लॉगर देवेंद्र सिंग यांच्या व्हिडिओच्या रूपात समोर आला आहे. देवेंद्रने २३ मे रोजी सकाळी ९.२५ वाजता नोंगरियाट गावाजवळील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजभोवती एक व्हिडिओ शूट केला होता, ज्यामध्ये सोनम, राजा आणि तिन्ही आरोपी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

(नक्की वाचा-  Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल)

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सोनम आणि राजा ट्रेकिंगसाठी जात होते. तर तिघेही आरोपी त्यांचा पाठलाग करत होते. शिलाँगच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, हे फुटेज या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा ठरेल. पोलिसांनी देवेंद्रचा जबाब नोंदवण्याची आणि त्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेघालय पोलीस आता सर्व आरोपींना भेटण्याची आणि गुन्ह्याचे दृश्य अधिक तपशीलवार पुन्हा तयार करण्याची तयारी करत आहेत.  राजाला न्याय मिळावा अशी कुटुंबीयांसह सर्वांचीच मागणी आहे .

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com