जाहिरात

Shocking News: गिझरच्या गरम पाण्यामुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाथरुममध्ये झाली भयंकर दुर्घटना

Rajasthan News: थंडीच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करणे आरामाचे वाटत असले तरी, हीच सवय एका चिमुकलीसाठी जीवघेणी ठरली आहे.

Shocking News: गिझरच्या गरम पाण्यामुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाथरुममध्ये झाली भयंकर दुर्घटना
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Rajasthan News:  थंडीच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करणे आरामाचे वाटत असले तरी, हीच सवय एका चिमुकलीसाठी जीवघेणी ठरली आहे. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंघोळीसाठी तयार ठेवलेले पाणी एका निष्पाप जिवासाठी इतके घातक ठरेल, याची कल्पनाही कोणाचे केली नव्हती.

ही हृदयद्रावक घटना राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी भागात घडली आहे. येथील साडेतीन वर्षांच्या रुमायशा नावाच्या चिमुकलीचा गिझरच्या अति गरम पाण्यामुळे होरपळून मृत्यू झाला आहे. थंडीमुळे पाणी गरम करण्यासाठी गिझरचा वापर केला जात होता, पण तोच वापर या कुटुंबासाठी कायमची जखम देऊन गेला आहे.

बाथरुममध्ये काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, रुमायशाचे वडील अमजद खान यांनी सांगितले की, गुरुवारी (8 जानेवारी, 2026) ही घटना घडली. बाथरुममध्ये गिझर सुरू करून बादलीत कडक गरम पाणी भरून ठेवले होते. रुमायशाची आई तिला अंघोळ घालण्यासाठी बाथरुमच्या दिशेने जात होती. मात्र, आई बाथरुममध्ये पोहोचण्यापूर्वीच रुमायशा तिथे गेली आणि तिने मगच्या साह्याने बादलीतील ते उकळते पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतले.

( नक्की वाचा : Pandharpur News : पंढरपुरात भाविकांसाठी 'फाइव्ह स्टार' व्यवस्था; स्काय वॉक, लिफ्ट आणि बरंच काही, वाचा सविस्तर )

उपचारादरम्यान चिमुकलीने सोडला प्राण

पाणी अतिशय गरम असल्याने रुमायशा गंभीररीत्या भाजली गेली. तिचा आक्रोश ऐकून पालकांनी तातडीने तिला रामगंजमंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला कोटा येथील MBS रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रात्रीच्या वेळी तिला कोटा येथे हलवण्यात आले, पण तिथल्या बर्न वार्डमध्ये उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

( नक्की वाचा : Trending News: 10 मुलींनंतर मुलगा झाला पण वडिलांना मुलींची नावे सांगताना का घाम फुटला? पाहा विशेष प्रतिक्रिया )

सुरक्षेचा मोठा प्रश्न

या घटनेनंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिवाळ्यात अनेक घरांमध्ये गिझर किंवा हीटर रॉडचा वापर केला जातो. मात्र, गिझरमध्ये पाणी जास्त गरम झाले असेल, तर ते लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणात कुटुंबीयांनी कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला असून, परिसरात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com