जाहिरात

Trending News: 10 मुलींनंतर मुलगा झाला पण वडिलांना मुलींची नावे सांगताना का घाम फुटला? पाहा विशेष प्रतिक्रिया

Trending News: एका माऊलीने तब्बल 10 मुलींना जन्म दिल्यानंतर आता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Trending News: 10 मुलींनंतर मुलगा झाला पण वडिलांना मुलींची नावे सांगताना का घाम फुटला? पाहा विशेष प्रतिक्रिया
Trending News : 37 वर्षांच्या महिलेने येथील तिच्या 11 व्या अपत्याला जन्म दिला
मुंबई:

Trending News: एका भावाच्या प्रतीक्षेत तब्बल 10 बहिणी आणि 19 वर्षांचा प्रदीर्घ काळ... अखेर एका घरामध्ये 11 व्या पाळण्याची दोरी हलली आणि त्या कुटुंबाची प्रतीक्षा संपली. ही बातमी ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटत असली तरी ती पूर्णपणे सत्य आहे. एका माऊलीने तब्बल 10 मुलींना जन्म दिल्यानंतर आता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

कोठे घडली ही थक्क करणारी घटना?

मुलाच्या जन्मासाठी 10 मुलींपर्यंत वाट पाहणारे हे कुटुंब उत्तर भारतातील हरियाणा राज्यातील आहे. हरियाणातील जींद जिल्ह्यातील उचाना शहरात ही किमया घडली आहे. 37 वर्षांच्या महिलेने येथील ओजस हॉस्पिटलमध्ये तिच्या 11 व्या अपत्याला जन्म दिला. हे दांपत्य मूळचे शेजारील फतेहाबाद जिल्ह्यातील असून प्रसूतीसाठी ते जींदमध्ये आले होते. 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या दांपत्याच्या घरी आता एका लहानग्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.


( नक्की वाचा : Trending News: बहिणीला आई बनवण्यासाठी तृतीयपंथीय भावाने स्वतःची प्रजनन शक्ती लावली पणाला; वाचा नेमकं काय घडलं? )
 

जीवघेणा प्रवास आणि डॉक्टरांची झुंज

ही प्रसूती सामान्य नव्हती, तर डॉक्टरांसाठी ते एक मोठे आव्हान होते. डॉ. नरवीर शेओरान यांनी सांगितले की, 10 वेळा बाळंतपण झाल्यामुळे आईचे शरीर अत्यंत थकलेले होते, त्यामुळे ही प्रसूती हाय रिस्क श्रेणीत होती. प्रसूती दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक झाली होती, तिला वाचवण्यासाठी तातडीने 3 युनिट रक्त चढवावे लागले. 

डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. 4 जानेवारी रोजी मुलाचा जन्म झाल्यानंतर आता या माऊलीला घरी सोडण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )

वडिलांची कैफियत आणि मुलींचे भविष्य

या मुलाचे वडील 38 वर्षांचे संजय कुमार असून ते व्यवसायाने रोजंदारी मजूर आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या मोठ्या मुलींनाही घरी एक भाऊ हवा होता. संजय कुमार यांना आपल्या 10 मुलींच्या नावांची उजळणी करतानाही कसरत करावी लागते, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

मात्र, आपली आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेले नाही. त्यांची मोठी मुलगी आता 12 वी मध्ये शिकत असून सर्व मुली शाळेत जात आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, असे सांगतानाच त्यांनी मुलाच्या जन्माचे श्रेय दैवी इच्छेला दिले आहे.

सामाजिक वास्तव आणि बदलती आकडेवारी

या घटनेने हरियाणातील लिंग गुणोत्तराच्या विषयाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे. 2015 च्या तुलनेत हरियाणाने मोठी प्रगती केली असून 2025 मध्ये 1000 पुरुषांमागे महिलांचे प्रमाण 923 पर्यंत पोहोचले आहे. असे असले तरी, एका मुलाच्या आशेपोटी आईच्या आरोग्याला धोका निर्माण होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. समाजात मुलींचे महत्त्व वाढत असले तरी मुलाचा अट्टहास आजही काही कुटुंबांमध्ये कायम असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com