जाहिरात
Story ProgressBack

राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये 32 जणांचा जीव घेणारी ती ठिणगी, पाहा CCTV VIDEO

गुजरातच्या राजकोट शहरातील 'टीआरपी गेमिंग झोन'मधील अग्नितांडव कसे घडले? याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Read Time: 3 mins
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये 32 जणांचा जीव घेणारी ती ठिणगी, पाहा CCTV VIDEO

Rajkot Fire CCTV Footage: गुजरातच्या राजकोट शहरातील 'टीआरपी गेमिंग झोन'मध्ये घडलेल्या अग्नितांडव प्रकरणी पोलिसांनी रविवारी (26 मे 2024) दोन जणांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली. या भीषण अपघातामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये नऊ लहान मुलांचाही समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त 'गेमिं झोन'चे अग्निसुरक्षा व्यवस्थेसंबंधीचे ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) नसल्याची धक्कादायक माहिती तपासामध्ये समोर आली आहे. दरम्यान, गेमिंग साइटवर लागलेल्या आगीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वेल्डिंगचे काम करताना आग भडकल्याचे दिसत आहे. वेल्डिंगचे काम सुरू असताना एक ठिणगी प्लास्टिकच्या ढिगाऱ्यावर आणि याचे रुपांतर भीषण आगीमध्ये झाले.  काही क्षणांमध्येच आगीने रौद्ररूप धारण केले. 

यावेळेस कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही आणि आगीमध्ये संपूर्ण गेमिंग झोन जळून खाक झाले. दरम्यान हा व्हिडीओ दुर्घटनाग्रस्त 'गेम झोन'चाच असल्याचा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.   

(नक्की वाचा: आग, धूर आणि किंकाळ्या! 32 जणांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्यासाठी करणार DNA टेस्ट)

राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, "स्थानिक पोलिसांनी नोव्हेंबर 2023मध्ये गेमिंग झोनसाठी बुकिंग परवाना दिला होता. यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीदरम्यान परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. गेमिंग झोनला रस्ते आणि इमारती विभागाकडून परवानगी मिळाली होती. अग्निसुरक्षेशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवण्यासाठी अग्निसुरक्षा उपकरणांचा पुरावाही सादर केला होता, यावर काम सुरू होते आणि अद्याप हे काम पूर्ण झालेले नव्हते. दरम्यान 'गेमिंग झोनमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे उपलब्ध होती. पण आग आटोक्यात आणण्यासाठी केलेली कारवाई पुरेशी नसल्याने शनिवारी दुर्घटना घडली".

(नक्की वाचा: 'रेमल' चक्रीवादळाचा कहर, पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ही राज्यं अलर्टवर)

योग्य अग्निशमन उपकरणे उपलब्ध नव्हती?

दाखल करण्यात आलेल्या FIRनुसार, आरोपींनी गेमिंग झोन तयार करण्यासाठी मेटल शीट फॅब्रिकेशनचा वापर करून अंदाजे दोन ते तीन मजल्यांची उंच, 50 मीटर रुंद आणि 60 मीटर लांबीचा ढाचा तयार केला. गेमिंग झोनच्या संचालकांकडे योग्य अग्निशमन उपकरणे नव्हती आणि त्यांनी अग्निशमन विभागाकडून एनओसीही करून घेतलेले नव्हते, असेही FIRमध्ये नमूद करण्यात आले आहे. राजकोटचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) पार्थराज सिंह गोहिल यांनी सांगितले की, टीआरपी गेम झोन चालवणाऱ्या रेसवे एंटरप्रायझेसचा भागीदार युवराज सिंग सोलंकी आणि व्यवस्थापक नितीन जैनला अटक करण्यात आली आहे.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

FIRमधील माहितीनुसार, राजकोट तालुका पोलिसांनी रविवारी (26 मे 2024) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धवल कॉर्पोरेशनचा मालक धवल ठक्कर, रेसवे एंटरप्राइझचे भागीदार अशोक सिंग जडेजा, किरीट सिंग जडेजा, प्रकाशचंद हिरन, युवराज सिंग सोलंकी आणि राहुल राठोड यांचा समावेश आहे.  

(नक्की वाचा: थरकाप उडवणारा अपघात CCTVमध्ये कैद, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने गमावला जीव)

एसआयटीकडे तपास सुपूर्द 

सह-अतिरिक्त पोलिस आयुक्त विधी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गेमिंग झोन अग्नितांडव प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि राजकोट पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे. तपासासाठी गुजरात सरकारने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुभाष त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय एसआयटीही स्थापन केली आहे.

दरम्यान बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरूच आहे. तर दुसरीकडे  राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आलेल्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
VIDEO: केदारनाथ मंदिरामागे हिमस्खलन; भाविकांमध्ये भीतीचं वातावरण
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये 32 जणांचा जीव घेणारी ती ठिणगी, पाहा CCTV VIDEO
BJP Devendra Fadnavis First reaction on lok sabha election 2024
Next Article
लोकसभेची कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढू, निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
;