जाहिरात
Story ProgressBack

Video अयोध्येच्या नव्या मंदिरातील पहिली रामनवमी! पाहा पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा

Ram Lalla Surya Tilak : अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जिथं जन्म झाला त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यात आलंय. त्या मंदिरात पहिल्यांदाच रामनवमी साजरी होत आहे.

Read Time: 2 min
Video अयोध्येच्या नव्या मंदिरातील पहिली रामनवमी! पाहा पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा
Ram Lalla Surya Tilak : डोळ्याचं पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा
अयोध्या:

Ram Lalla Surya Tilak : देशभर आज रामनवमीचा उत्साह आहे. यावर्षीची रामनवमी ही विशेष आहे. कारण, अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जिथं जन्म झाला त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यात आलंय. या राममंदिरातील ही पहिलीच रामनवमी आहे. या निमित्तानं रामलालाची विशेष पूजा करण्यात आली.  त्यानंतर बरोबर दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी सूर्यतिलक सोहळा झाला. यावेळी सूर्यकिरण रामललाच्या कपाळापर्यंत आली आणि 5 मिनिटांपर्यंत आणि  5 मिनिटांपर्यंत सूर्य किरण दिसत होते.  

श्रीराम जन्माचा हा भव्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी जगभरातून हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या विमान तिकिटांमध्येही वाढ झालीय.  मुंबई-अयोध्या विमान प्रवासासाठीचे दर काही दिवसांपूर्वी 6 हजार ते 7 हजारांपर्यंत होते. ते वाढून आता 11 हजार ते 13 हजारांपर्यंत पोहोचले आहेत.

ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या विमानाचे मुंबई ते अयोध्यासाठी तिकीटदर 15,500 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत येणाऱ्या भक्तांची गर्दी पाहता हॉटेल्स व्यावसायिकांनी देखील आपले दर वाढवले आहेत. 

श्रीरामापासून प्रत्येकानंच शिकल्या पाहिजेत 'या' 5 गोष्टी

5 शतकांच्या प्रतीक्षेनंतर भाग्य

रामनवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. PM मोदी यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले आहे की, "ही पहिली रामनवमी आहे, आमचे रामलला अयोध्येच्या भव्यदिव्य राम मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. आज रामनवमीच्या या उत्सवामुळे अयोध्यत आनंदाचे वातावरण आहे. पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये रामनवमी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे. देशवासीयांच्या इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्येचे आणि त्यागाचे हे फळ आहे".

भव्य राम मंदिरातील हा पहिला रामनवमी सोहळा म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या असंख्य रामभक्तांचे, संत-महात्मांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्याची संधी आहे, असंही पंतप्रधानांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हंटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination