दारु दिली नाही म्हणून एका व्यक्तीने बारमधील डीजेची (डिस्क जॉकी) गोळी घालून हत्या केली आहे. झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी रात्री ही घटना घडली आहे. एक्सट्रीम बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्यासोबत चारजण रात्री उशीरा एक्सट्रीम बारमध्ये पोहोचले होते. मात्र बार त्यावेळी बंद झाला होता. सर्वांना बारमधील कर्मचाऱ्याकडे दारुची मागमी केली. मात्र बारमधील कर्मचाऱ्याने बार बंद झाल्याने दारु देण्यास नकार दिला. त्यावरुन कर्मचारी आणि या तरुणांमध्ये बाचाबाची झाली.
(नक्की वाचा- 'या' शहरात दगडफेक गँगची दहशत, रात्री करतात वाहनांची तोडफोड)
झारखंड की राजधानी रांची में देर रात शराब दिए जाने से मना करने पर एक व्यक्ति ने बार में मौजूद DJ की गोली मारकर हत्या कर दी. जानकारी के मुताबिक यह घटना रविवार देर रात की है.#Jharkhand #Ranchi #CrimeNews pic.twitter.com/tNQqHIOnLg
— NDTV India (@ndtvindia) May 27, 2024
या वादादरम्यान एका तरुणाने आपल्याकडील रायफलने कर्मचाऱ्यावरे गोळी झाडली. डीजेच्या छातीत ही गोळी लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. घटनेनंतर आरोपींना घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
(नक्की वाचा - पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टबद्दल मोठा खुलासा; ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक)
जखमी कर्मचाऱ्याला जवळील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेचा तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world