भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनकडून 100 टनहून अधिक सोनं भारतात आणलं आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम पाहायला मिळेल. भारतात आता परिस्थिती बदलत आहे. एक वेळ होती, जेव्हा देशातील सोनं बाहेर ठेवल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र आता भारत ब्रिटनकडे असलेलं आपलं सोनं पुन्हा घेऊन येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरबीआय अधिकाऱ्यांनुसार, तब्बल 100 टन सोनं येत्या दिवसात भारतात आणण्यात येईल. भविष्यात देशातील वित्तीय स्थिरता कायम राखण्यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीत सोन्याचं प्रमाण वाढवत आहे.
1991 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने सोनं रिझर्व्हमध्ये सामील करण्यात आलं आहे. येत्या महिन्यात इतकं सोनं पुन्हा देशात आणण्यात येईल. सूत्रांनी टीओआयला दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकड्यांनुसार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आरबीआयजवळ 822.1 टन सोनं होतं, ज्यातील 413.8 टन सोनं परदेशात ठेवण्यात आलं होतं. आता हेच सोनं हळूहळू भारतात आणलं जात आहे. जागतिक आकडेवारीनुसार, RBI ही अलिकडच्या वर्षांत सोने खरेदी करणारी मुख्य मध्यवर्ती बँक आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात आपल्या रिझर्व्हमध्ये 27.5 टन सोन्याची भर घातली आहे.
नक्की वाचा - लवकरच 'चांदी लाखात'; आज चांदीच्या दराने बाजारात खळबळ, काय आहेत दर?
RBI सोनं का खरेदी करतो?
बऱ्याच काळापासून जगभरातील सर्व केंद्रीय बँकांसाठी बँक ऑफ इंग्लंड सर्वात मोठं साठवणुकीचं केंद्र राहिलं आहे. भारतदेखील स्वातंत्र्यापूर्वीपासून इग्लंडच्या बँकेत आपल्याकडील सोनं ठेवत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने काही वर्षांपूर्वी सोनं खरेदी करणं सुरू केलं होतं. यावेळी कुठून भारताचं सोनं परत आणता येऊ शकतं, याचीही समीक्षा केली होती. परदेशातील स्टॉक वाढत होतं, याचसाठी काही सोनं भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यातील परिस्थितींचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय अर्थव्यवस्थेची बदलती परिस्थिती...
भारतीयांसाठी शतकानुशतके सोनं भावनिक मुद्दा आहे. येथे प्रत्येक घरात सोनं असतं आणि ते विकणं फारसं चांगलं मानलं जात नाही. आरबीआयने तब्बल 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषातून तब्बल 200 टन सोनं खरेदी केलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world