11 जानेवारीपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी राज्यभरात ४२ ठिकाणी कॉपीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा कॉपीमुक्तचा नारा दिला होता. त्यामुळे यासंदर्भात बैठक घेण्यात आली असून सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदविल्यात आला असून यात नवी माहिती समोर आली आहे.
माजी आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
माजी आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. रात्री उशिरा ही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील शुभ दीप या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी भेट होणार आहे. उद्या पक्षप्रवेश करणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत
काँग्रेस प्रदेशअध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचा ऐवजी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत आहे. अधिकृत नाव अद्याप जाहीर नाही. पण पुढील काही दिवसात सपकाळ यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. सपकाळ माजी आमदार असून बुलढाणा जिल्ह्यातून येतात. मुकुल वासनिक यांच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.
'लोकांना परजीवी बनवू नका', सर्वोच्च न्यायालयाचे लोकप्रिय घोषणांवर ताशेरे
'लोकांना परजीवी बनवू नका', लोकांना आयतं मिळत असल्याने ते काम करणं सोडत आहे. काही न करता त्यांना पैसेही मिळत आहे. असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या सरकारांनी केलेल्या लोकप्रिय घोषणांवर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात.
Live Update : शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी
शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी
सज्जन कुमार यांना हत्या प्रकरणात दोषी जाहीर करण्यात आलं आहे. १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आलं आहे.
Live Update : काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश...
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश...
यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला हक्काची जागा न सोडतात व उमेदवारी नाकारल्याने हेमलता पाटील नाराज होत्या. महानगरपालिकेचा निवडणुकीची दूरदृष्टी ठेवून निवडणूक लढण्याची तयारी..
हेमलता पाटील ह्या एक वेळा विधानसभा लढल्या असून सहा वेळा मान नाशिक महानगरपालिके नगरसेविका होत्या. त्यांनी थेट दिल्ली येथे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे
Live Update : इंद्रायणी मुखर्जीच्या परदेश दौरास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार
इंद्रायणी मुखर्जीच्या परदेश दौरास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार
Live Update : नाशिकच्या उद्योग जगतासाठी खुशखबर..
नाशिक महापालिकेने उद्योजकांच्या घरपट्टीत 2018 पासून केलेली अवास्तव अकरा पटीची दरवाढ अखेर रद्द करण्यात आली असून यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे उद्योजकांवर मोठा आर्थिक ताण पडत होता. उद्योजकांच्या निमा व आयमा या संघटनेमार्फत सातत्याने राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता. नाशिक महानगरपालिकेने 2018 साली शेडसाठी 4.40 रुपयावरून दर थेट 44 रुपये केला होता मात्र तो आता अकरा रुपये करण्यात आला आहे तर आरसीसी कन्स्ट्रक्शनसाठी 4.95 रुपयावरून थेट 65 वर घरपट्टीचा दर केला होता आणि आता तो 13.20 रुपये या दराप्रमाणे आकारण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
Live Update : लसणाचे दर अर्ध्यावर, ग्राहकांना दिलासा!
गेल्या दोन महिन्यांपासून लसणाच्या वाढत्या दराने नागरिक त्रस्त होते. किंमत तब्बल 400 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने अनेकांनी त्याचा वापर कमी केला होता. मात्र, आता वाशिमच्या बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. किरकोळ बाजारात गावरान लसूण 200 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना परळीत मारहाण झाली होती. बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत जाधव गेले असता हा प्रकार घडला.
धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड याने मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
कैलास फड, त्यांचा मुलगा निखिल फड यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यानंतर पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आधीच हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड चर्चेत आला होता.
Live Update : शहापूर आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी व बारदान घोटळ्यात अपर्णा खाडे यांचं उपोषण
शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकांऱ्यांकडून भात खरेदी व बारदान वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तर काही मोकाट फिरत आहेत. महामंडळाच्या याच विविध घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसच्या शहापूरातील पदाधिकारी अपर्णा खाडे या उपोषणासाठी बसल्या आहेत.
Live Update : बैलगाडीची परंपरा आजही जपणारी संत अवलिया महाराजांची यात्रा
वाशीमच्या मालेगांव तालुक्यात नागपूर-संभाजीनगर द्रुतगती मार्गावर असलेल्या संत अवलिया महाराजांच्या यात्रेला भक्तगण मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. पूर्वीच्या काळात गावोगावी जाण्यासाठी बैलगाडी हाच प्रमुख वाहतुकीचा पर्याय होता. विशेषतः यात्रांसाठी भक्त नवस फेडण्यासाठी बैलगाडीतून यात्रेला जात असतात.
कालांतराने आधुनिकतेचा प्रभाव वाढला, आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वापर अधिक होऊ लागला. आज बहुतांश यात्रेकरू दुचाकी किंवा ऑटोरिक्षातून यात्रेला जात असले, तरी काही भक्तगण मात्र पारंपरिक प्रथा जपत बैलगाडीतूनच संत अवलिया महाराजांच्या यात्रेसाठी जात असल्याचं दिसून आलं आहे.
Live Update : अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका 60 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
बुलढाण्याच्या शेगाव येथील अनुसूचित जातीच्या मुलींची निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्याकडून सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडून अहवाल देण्यासाठी 2 लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी तडजोडीअंती दोन महिन्याचे 60 हजार रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने तक्रारकर्ता महिला, आरोपी महिला आणि कारवाई करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी देखील महिला असल्याचा योगायोग पाहायला मिळाला आहे...