जाहिरात

Nanded: जिद्दीला सलाम! बाळंतपणानंतर 2 दिवसात पेपर;नांदेडची शीतल 10 दिवसाच्या बाळासह 12वीच्या परीक्षेला पोहोचली

Nanden News: नांदेडमधील शीतल चित्ते या 21 वर्षीय विद्यार्थिनीने बाळंतपणानंतर अवघ्या 10 दिवसांत आपल्या नवजात बाळासह 12वीची परीक्षा दिली. त्यांच्या जिद्दीमुळे कॉलेजने केंद्रावर विशेष पाळणाघर सुरू केले. वाचा ही प्रेरणादायी बातमी.

Nanded: जिद्दीला सलाम! बाळंतपणानंतर 2 दिवसात पेपर;नांदेडची शीतल 10 दिवसाच्या बाळासह 12वीच्या परीक्षेला पोहोचली
'Nanded News: 21 वर्षीय तरुणीने 10 दिवसांच्या बाळासह लिहिला 12वीचा पेपर"
PTI

Nanden News: शिक्षणाप्रती असलेल्या जिद्दीपुढे कोणतीही अडचण मोठी नसते, हे नांदेडमधील एका 21 वर्षीय माऊलीने सिद्ध करून दाखवले आहे. शीतल चंद्रकांत चित्ते (Shital Chandrakant Chitte)असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. शीतल आपल्या अवघ्या 10 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन इयत्ता 12वीची (HSC) परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचल्या. त्यांच्या या धाडसाचे आणि ध्येयवेडाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाळंतपणानंतर दोनच दिवसांत पहिला पेपर | Shital Chandrakant Chitte News

श्री बसवेश्वर महाविद्यालयाची (Shri Basweshwar College) विद्यार्थिनी असलेल्या शीतल यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. 10 फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पहिला पेपर होता आणि त्यापूर्वी केवळ दोन दिवस आधीच त्यांची प्रसूती झाली होती. शारीरिक थकवा असताना शीतल यांनी हार न मानता आपल्या बहिणीच्या मदतीने इंग्रजीचा पेपर दिला. त्यानंतर बुधवारी त्या आपल्या 10 दिवसांच्या नवजात बाळासह राज्यशास्त्र विषयाचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या होत्या. 

कॉलेजने उभारलं 'मातृस्नेह कक्ष' | Matrusneh Kaksha

शीतल यांची जिद्द पाहून पीपुल्स कॉलेजच्या प्रशासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांच्यासाठी परीक्षा केंद्रावर विशेष 'मातृस्नेह कक्ष' तयार करण्यात आलंय. इतकेच नव्हे तर बाळासाठी पाळण्याचीही सोय करण्यात आली, जेणेकरून शीतल यांना शांतपणे पेपर लिहिता येईल.

(नक्की वाचा: SSC Exam 2026 Wishes: टेन्शन विसरा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा;10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनिमित्त पाठवा शुभेच्छा)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

का घ्यावा लागला हा निर्णय?

शीतल चित्ते यांनी सांगितलं की, "माझ्या भविष्यासाठी इयत्ता 12वीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पती कामावर जात असल्याने घरी बाळाची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. त्यामुळे बाळाला सोबत घेऊन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबानेही मला पाठिंबा दिला".

शिक्षण विभागाकडून कौतुक

नांदेडचे शिक्षणाधिकारी माधव साळगर यांनी कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि आगामी काळात अशा गरजू विद्यार्थिनींसाठी परीक्षा केंद्रांवर विशेष व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिलंय. लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी ही राज्यातील अशा प्रकारची पहिलाच कौतुकास्पद उपक्रम असल्याचे म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com