जाहिरात

RTO New Rules: एक चूक अन् लायसन्स रद्द! नवीन नियम धडकी भरवणारा, नितीन गडकरींची मोठी घोषणा

पण याची अंमलबजावणी किती प्रभावी पणे होते यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

RTO New Rules: एक चूक अन् लायसन्स रद्द! नवीन नियम धडकी भरवणारा, नितीन गडकरींची मोठी घोषणा
  • सरकारने देशातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी ग्रेड-आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला
  • या प्रणालीअंतर्गत नियम मोडल्यावर चालकाच्या लायसन्सवरून गुण वजा होऊन लायसन्स रिपोर्ट कार्डसारखे काम करेल
  • गुण कमी झाल्यास चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित होईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होईल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आता कठोर पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच 'ग्रेड-आधारित ड्रायव्हिंग लायसन्स सिस्टम' (Point-based DL System) लागू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या नियमांमुळे आता वाहनचालकांना केवळ आर्थिक दंड भरून सुटका करून घेता येणार नाही, तर त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरही गदा येऊ शकते. यातून चालकांना शिस्त लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

या नव्या प्रणालीमध्ये प्रत्येक वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स हे एका 'रिपोर्ट कार्ड'प्रमाणे काम करेल. जेव्हा एखादा चालक वाहतुकीचे नियम मोडेल, तेव्हा त्याच्या लायसन्सवरील ठराविक गुण (पॉइंट्स) कापले जातील. जर हे गुण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाले, तर संबंधित चालकाचे लायसन्स 6 महिन्यांसाठी निलंबित (Suspend) केले जाईल. हा त्या चालकासाठी दणका असेल. त्याला गाडी चालवता येणार नाही. शिवाय पुढील प्रक्रीयेतून त्याला जावे लागणार आहे. 

नक्की वाचा - Alcohol vs Lifestyle: जास्त मद्यपान करूनही युरोपीय लोक भारतीयांपेक्षा तंदुरुस्त कसे? 'हा' आहे दोघांमधला फरक

या कारवाईत केवळ निलंबनच नाही, तर वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांसाठी हा नियम अधिक कडक असेल. एखादा चालक वारंवार गंभीर चुका करत असेल, तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही या नव्या प्रणालीत करण्यात आली आहे. त्यामुले त्याला भविष्यात कधी ही लायसन्स मिळणार नाही. ही कठोर नियम केल्यास वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल. पण याची अंमलबजावणी किती प्रभावी पणे होते यावर या योजनेचा भवितव्य अवलंबून आहे. 

नक्की वाचा - ज्या हॉटेलमध्ये रश्मिका-विजयचं शाही लग्न झालं, तिथलं एका रात्रीचं भाडं किती? किंमत ऐकून धक्का बसेल

या चुका महागात पडणार

  • मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे (Overspeeding).
  • गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे.
  • चुकीच्या दिशेने (Wrong Side) वाहन चालवणे.
  • मद्यपान करून गाडी चालवणे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com