
महिलांबाबत वाट्टेल ते बरळण्याची लागण झाली आहे की काय अशी म्हणण्याची स्थिती निर्णाण झाली आहे. आधी अनिरुद्धाचार्य, त्यानंतर प्रेमानंद यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. त्यात आता साध्वी ऋतंभरा यांची भर पडली आहे. एकाला झाकावं तर दुसरं उघडं पडतंय अशी काहीशी स्थिती सध्या बाबा-महाराजांच्या बाबतीत घडत आहे. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्च महाराज यांची महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच साध्वी ऋतंभरा यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रिल्स बनवणाऱ्या हिंदू महिलांवर सडकून टीका केली आहे.
अनिरुद्धचार्य-प्रेमानंद के बाद अब साध्वी ऋतंभरा ने लड़कियों को लेकर कह दी बड़ी बात
— Priya Sinha🇮🇳 (@iPriyaSinha) August 1, 2025
हे भगवान …😳 pic.twitter.com/jvLrHrjRLW
साध्वी ऋतंभरा म्हणत आहे की हिंदू मुली नग्न होऊन पैसे कमवत आहेत. त्या पैशासाठी अश्लील ठुमके लावत आहेत. त्यातून त्या पैसे कमवत आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. खरंतर हा व्हिडीओ मे महिन्यातलाच आहे. पण प्रेमानंद आणि अनिरुद्धाचार्य यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेमानंद आणि अनिरुद्धाचार्य यांनी मुलींच्या चारित्र्यावरून वादग्रस्त टिप्पणी केली होती.
नक्की वाचा - 33 वर्षांत पहिल्यांदाच शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार, शामची आई ही ठरला सर्वोत्तम
प्रेमानंद महाराज म्हणाले होते की 100 पैकी फक्त 2-4 मुलीच पवित्र राहिल्या आहेत. अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले होते की 25 व्या वर्षी मुली चार ठिकाणी तोंड मारून येतात. या दोन्ही महाराजांच्या विधानांमुळे महिला वर्गात नाराजीचं वातावरण होतं. अशातच आता साध्वी ऋतंभरा यांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हिंदू कट्टरपंथी अशी साध्वी ऋतंभरा यांची ओळख आहे. मथुरा-वृंदावनमध्ये वात्सल्य ग्राम या आश्रमाचं संचालन त्या करतात. साध्वी ऋतंभरा राममंदिर आंदोलनादरम्यान भडक भाषणांमुळे लोकप्रिय झाल्या होत्या. 'मंदिर वही बनाएंगे' या घोषणेसह त्यांनी राममंदिर उभारणीचा प्रचार केला होता.
नक्की वाचा - Bin Lagnachi Goshta Teaser : ‘बिन लग्नाची गोष्ट' टीझर रिलीज; नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
बाबरी मशिद पाडल्यानंतर साध्वी ऋतंभरा यांच्याविरोधातही खटला चालला होता. साध्वी ऋतंभरा यांना हल्लीच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ही करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर महिलांचं अंगप्रदर्शन करणाऱ्या रिल्सवरून साध्वी ऋतंभरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण कथावाचकांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला वर्गातही नाराजीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world